श्री क्षेत्र वाशिंबे येथील भैरवनाथ यात्रोत्सवात 'चागंभलं' घ्या घोषणा अन् गुलालाची उधळण
वाशिंबे (कटूसत्य वृत्त):- 'भैरवनाथचं चांगभलं' या जयघोषाने वाशिंबे नगरी दुमदुमली. गुलालाची उधळण करत भाविकांनी उत्साह शिगेला पोहोचवला. ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात भक्तीचा जल्लोष पाहायला मिळाला.
देवाच्या घोड्यावरील छबिन्याच्या मिरवणुकीत भाविक भक्तांची अलोट गर्दी होती. 'नाथ साहेबांचं चांगभलं' अशा जयघोषात संपूर्ण वाशिंबे नगरी भक्तिमय झाली. गुलाल उधळण्याच्या वर्षावाने भाविकांनी भैरवनाथ महाराज व जोगेश्वरी आईसाहेबचा मानाने सन्मान केला.परंपरेनुसार पालखी सोहळा, विवाह सोहळा, कावडी नृत्य , छबिना पालखी आणि इतर धार्मिक विधी मोठ्या उत्साहाने पार पडले.मंदिरावरती सुंदर फुलांनी सजावट करण्यात आली होती. फटाक्यांचा अतीषबाजीने व विद्युत रोषणाईने मंदिर परिसरात उजळून गेला होता.
वाशिंबे हे करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून, भैरवनाथ देवस्थान हे गावाचे संरक्षक दैवत मानले जाते. दरवर्षी यात्रा उत्सवात परिसरातील हजारो भाविक सहभागी होतात. यावर्षीही उत्सवात भक्तीभाव, एकता आणि आनंदाचे दर्शन घडले.
या उत्सवानिमित्त भैरवनाथ मंदिर परिसरात भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले होते.अनेक नामवंत महाराष्ट्र चॅम्पियन मल्ल यांनी सहभाग नोंदविला.सर्वधर्म समभावाचे प्रतिक असणाऱ्या या यात्रेत विविध समाजातील लोकांचा मान आसतो.ही यात्रा पारंपरिक पद्धतीने साजरी होते..युकवांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
हाजारो भाविकांनी
'भैरवनाथाच्या नावानं चांगभलं' असे म्हणत देवाच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली.ही यात्रा वर्षभराची ऊर्जा आणी साकारत्मता देते.या उत्सवाचे सर्व नियोजित कार्यक्रम भैरवनाथ मंदिर ट्रस्ट,बलुतेदार मंडळ,ग्रामस्थ यांनी योग्य नियोजनात पार पाडले.

No comments:
Post a Comment