शिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 6, 2026

शिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

 शिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना सोलापूर शहर-जिल्हाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख , उपजिल्हाप्रमुख अक्षय बिद्री, संजय सरवदे, तालुकाप्रमुख राजकुमार शिंदे, उपशहरप्रमुख अयुब पठाण, कुणाल दिक्षित, अमोल कदम, समीर मुजावर, अमीर मुजावर, शिवकांत शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून समाजकार्य व राष्ट्रहितासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages