नीरा देवघर सिंचन प्रकल्प रखडला; PIB बैठकीला अद्याप नवी तारीख नाही - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 6, 2026

नीरा देवघर सिंचन प्रकल्प रखडला; PIB बैठकीला अद्याप नवी तारीख नाही

 नीरा देवघर सिंचन प्रकल्प रखडला; PIB बैठकीला अद्याप नवी तारीख नाही


अकलूज (कटूसत्य वृत्त):- माढा लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या नीरा देवघर सिंचन प्रकल्पाबाबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभेत लेखी प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले.

खासदार मोहिते पाटील यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांमध्ये महाराष्ट्रातील नीरा देवघर सिंचन प्रकल्पास आर्थिक मान्यता देण्यासाठी सार्वजनिक गुंतवणूक मंडळ (PIB) कडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता काय? 

तसेच या प्रस्तावाच्या परीक्षणासाठी PIB ची बैठक निश्चित करण्यात आली होती काय? असल्यास, त्याचा तपशील काय आहे आणि संबंधित मंत्रालयाच्या विनंतीवरून ही बैठक पुढे ढकलण्याची कारणे काय होती? सदर PIB बैठकीसाठी नवीन तारीख निश्चित करण्यात आली आहे काय? तसेच या संदर्भात कोणताही पाठपुरावा प्रस्ताव  सादर करण्यात आला आहे काय?  

त्याचबरोबर विशेषतः माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वेळेवर सिंचन सुविधा मिळाव्यात यासाठी निरा देवघर सिंचन प्रकल्पास मान्यता मिळवून देण्याकरिता मंत्रालयाकडून कोणती ठोस पावले उचलण्यात येत आहेत?

यावर केंद्र सरकारच्या वतीने उत्तर देताना केंद्रीय जल शक्ती राज्यमंत्री राज भूषण चौधरी यांनी लेखी उत्तर दिले की, नीरा देवघर सिंचन प्रकल्पाचा सुमारे ₹३,५९१.४६ कोटी खर्चाचा प्रस्ताव PMKSY-AIBP योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यासाठी सार्वजनिक गुंतवणूक मंडळाकडे पाठविण्यात आला आहे.

या प्रस्तावाच्या परीक्षणासाठी ७ जून २०२४ रोजी PIB बैठक निश्चित करण्यात आली होती. मात्र ही बैठक पुढे ढकलण्यात आली असून, अद्याप नवीन तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. तसेच या प्रकल्पाच्या संदर्भात पुढील प्रक्रिया PIB च्या मूल्यांकन व शिफारशींनंतरच होणार असल्याचेही सरकारने लेखी उत्तर देत स्पष्ट केले.

केंद्र सरकारच्या या उत्तरामुळे निरा देवघर सिंचन प्रकल्पाची मंजुरी अद्याप प्रलंबित असल्याचे स्पष्ट झाले असून, माढा मतदारसंघातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सिंचन सुविधेसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages