थकबाकीदारांवर नगरपालिकेचा दणका; जुन्या मंडईजवळील गाळा सील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, April 4, 2026

थकबाकीदारांवर नगरपालिकेचा दणका; जुन्या मंडईजवळील गाळा सील

 थकबाकीदारांवर नगरपालिकेचा दणका; जुन्या मंडईजवळील गाळा सील

सांगोला (कटूसत्य वृत्त): सांगोला नगरपरिषदेकडून शहरात कर वसुलीची विशेष मोहीम जोरात सुरू असून थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. याच अनुषंगाने जुन्या मंडई परिसरातील नगरपरिषद मालकीचा एक गाळा थकबाकीपोटी सील करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरक्षण क्रमांक २३ मधील संबंधित गाळ्याचे मागील दोन वर्षांपासून भाडे व कराची रक्कम थकीत होती. नगरपरिषदेकडून वारंवार सूचना देऊनही थकबाकीचा भरणा न झाल्याने अखेर गाळा सील करण्याची कारवाई करण्यात आली.
सांगोला नगरपरिषदेमार्फत मागील काही महिन्यांपासून कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने प्रशासन संचालनालयाकडूनही सातत्याने आढावा व सूचना दिल्या जात आहेत. त्यानुसार थकबाकीदारांवर कठोर पावले उचलली जात आहेत.
ही कारवाई मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी सचिन पाडे व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी केली.
दरम्यान, नगरपरिषद हद्दीतील ज्या गाळेधारकांनी व मालमत्ताधारकांनी अद्याप थकीत भाडे व कराची रक्कम भरलेली नाही, त्यांच्या मालमत्तांवरही सील करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
थकबाकीदारांनी तातडीने थकीत व चालू कराचा भरणा करून नगरपरिषदेस सहकार्य करावे आणि कठोर कारवाई टाळावी, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages