ग्रंथालय निरीक्षक संजय ढेरे यांना पितृ शोक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 3, 2026

ग्रंथालय निरीक्षक संजय ढेरे यांना पितृ शोक

 ग्रंथालय निरीक्षक संजय ढेरे यांना पितृ शोक 



अकलूज (कटूसत्य वृत्त):-जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील निरीक्षक संजय ढेरे यांचे पिताश्री कैलासवासी तानाजी ढेरे यांचे वृद्धापकाळाने अकलूज येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून विविध स्तरांतून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.


तानाजी ढेरे हे शांत, संयमी व कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपल्या आयुष्यात सामाजिक बांधिलकी जपत कुटुंबीय व समाजासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाने ढेरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारांची विधी अकलूज येथे पार पडली असून नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना अंतिम निरोप दिला.


तानाजी ढेरे यांच्या निधनाबद्दल जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages