नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशन चे सल्लागार श्री शंकर ( अण्णा )नारायण बटगिरी यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा बसवेश्वर मेडिकल फाऊंडेशन व न्यू लाईफ मेडिको सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर चे आयोजन राजेंद्र चौक यैथे करण्यात आली.
या शिबीराचे उद्घाटन डॉ . प्रकाश घटोळे सर यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर स्वामीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नीलकंठेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री राजीव आडकी , माजी विश्वस्त व शिक्षण संस्थेचे संचालक श्री श्रीनिवास बंदगी, प्रेसिडेंट सुनिल धुळम, अंबादास नादरगी, बालमणी कस्सा, लक्ष्मीकांत आडकी, प्रशांत आरकेल, लखन मिठ्ठा, प्रशांत दंडगळ, विद्या सिंगम इतर सर्व समाज बांधव उपस्थित होते.
या शिबीरात एकुण 52 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. यापैकी मोतीबिंदु शस्त्र क्रिया साठी 12 रुग्णांची निवड करण्यात आली.
उपस्थित सर्व रुग्णांची तपासणी करुन मार्गदर्शन करण्यात आली.शेवटी श्री शंकर बटगिरी यांनी सर्वाचे आभार मानलै.
No comments:
Post a Comment