प्रवासी सेवा संघाच्या मागणीस यश! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 3, 2026

प्रवासी सेवा संघाच्या मागणीस यश!

 प्रवासी सेवा संघाच्या मागणीस यश!


सांगोला आगाराची -

आटपाडी -नाझरे - सांगोला - गाणगापूर बसफेरी सुरू ...


नाझरे पंचक्रोशीतील वझरे अनकढाल, चोपडी, बलवडी, सरगरवाडी, राजुरी, चिनके या भागातील भाविकांची अनेक वर्ष्यापासून पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर येथे देव दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे परंतु वरील ठिकाणी जाण्यासाठी डायरेक्ट बससेवा नसल्याने बसेस बदलत जावे लागत होते हा प्रवास त्रासदायक होतं असल्याने अनेक जण खाजगी वाहने करून प्रवास करीत होती  हा प्रवास खर्चिक असल्यामुळे या भागातून गाणगापूर येथे जाण्यासाठी डायरेक्ट बससेवा असावी अशी इच्छा व मागणी होती तसेच वरील भागातील नागरिकांना सोलापूर जिल्हा असल्यामुळे सर्व शासकीय कामासाठी, जिल्हा परिषद, कोर्ट कामासाठी तसेच रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटल येथे सकाळी लवकर जाण्यासाठी व विद्यार्थीना विद्यापीठ येथे जाण्यासाठी डायरेक्ट बस नसल्याने गैरसोय होतं होती त्यामुळे या भागातून सोलापूर बस सेवा असावी ही सुद्धा मागणी होती आणि ही गैरसोय पाहून व सिव्हिल हॉस्पिटल मध्ये या भागातील येणाऱ्या रुग्णाची उशिरा आल्यावर होणारी गैरसोय विचारात घेऊन सिव्हिल येथे कार्यरत असलेले श्री तातोबा वाघमारे यांनी प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष श्री कुमार नरखडे यांना ही बाब निदर्शनास आणून दिल्याने गेल्या दोन महिन्यापासून एकाच बसमधून पंढरपूर सोलापूर अक्कलकोट गाणगापूर प्रवास कसा करता येईल  याचा  विचार करून श्री कुमार नरखडे यांनी प्रवाशी सेवा सघाचे जिल्हाध्यक्ष श्री संजय पाटील यांच्याशी चर्चा करून सांगोला आगार प्रमुख श्री विकास पोपळे यांच्याशी याबाबत विचार विनिमय करून त्यानी लगेच वरील भागातील भाविकांची प्रवाशांची विद्यार्थी यांची गैरसोय मागणी लक्षात घेऊन आटपाडी गाणगापूर बस सेवा सुरु करूया असा शब्द दिला पण त्यासाठी विभाग नियंत्रक सोलापूर येथून मान्यता आणावी लागेल असे सांगितले ही मान्यता मिळविण्या साठी संजय पाटील कुमार नरखडे यांनी वारंवार सोलापूर येथील  विभाग नियंत्रक श्री अमोल गोंजारी साहेब डीटीओ परशुराम नकाते साहेब व श्रीपाद पोतदार साहेब यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करून सर्वांनी ह्या बस सेवेला मान्यता दिली त्यानुसार दिनांक 06/04/2026 पासून आटपाडी येथून सकाळी 6.30 वा 

नाझरे येथून 7.00 वा सांगोला येथून 7.30 वाजता सुटून ती गाणगापूर येथे दुपारी 1.30 वा पोहचणार आहे गाणगापूर येथून दुपारी 2.30 वा ही बस सेवा सुरु होणार असल्यामुळे या भागातील भाविक दैनंदिन प्रवाशी विद्यार्थी यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे ही  बस आटपाडी सांगोला या मार्गांवरील सर्व थांबे घेणार असल्यामुळे ग्रामीण विभागातील प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे सदरची बससेवा सुरु करण्यासाठी श्री संजय पाटील श्री कुमार नरखडे श्री तातोबा वाघमारे श्री बंडगर श्री अमोल गोंजारी साहेब श्री परशुराम नकाते साहेब श्रीपाद पोतदार साहेब श्री विकास पोपळे यांनी सर्वांनी मिळून या भागातील प्रवाशांची सोय केली याबाबत त्यांचे या भागातील प्रवासाकडून अभिनंदन करून त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे तसेच सांगोला आगार प्रमुख व प्रवाशी संघटनेकडून आवाहन करण्यात येते की खाजगी वाहणाने प्रवास करून जीव धोक्यात घालण्यापेक्षा सुरक्षित प्रवास म्हणून सदर सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसेच सदर बसला महिलांना जेष्ठ नागरिकांना 50% सवलत व अमृत जेष्ठ नागरिकांना सवलती नियमानुसार लागू राहतील

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages