यूजीसीकडून दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सला उच्च शिक्षणासाठी मान्यता - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, April 25, 2026

यूजीसीकडून दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सला उच्च शिक्षणासाठी मान्यता

 यूजीसीकडून दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सला उच्च शिक्षणासाठी मान्यता



कोर्टी (कटूसत्य वृत्त):-दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स या शिक्षण संस्थेला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) उच्च शिक्षणासाठी अधिकृत मान्यता मिळाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी दिली.


दत्तकला शिक्षण संस्था संचलित या महाविद्यालयाला यूजीसीच्या कलम २ (एफ) अंतर्गत मान्यता प्राप्त झाली असून, त्यामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेला अधिक बळकटी मिळणार आहे. या मान्यतेमुळे महाविद्यालय विविध शासकीय योजना, अनुदाने तसेच शैक्षणिक प्रकल्पांसाठी पात्र ठरणार आहे.


महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रम राबविले जात असून अभियांत्रिकी (डिप्लोमा, बी.ई., एम.ई.), एमबीए, एमसीए, बीबीए, बीसीए आदी अभ्यासक्रमांसह आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित शाखांमध्ये शिक्षण दिले जाते. सध्या संस्थेत सुमारे ५ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.


विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) तसेच चौथी औद्योगिक क्रांती यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे.


याशिवाय, महाविद्यालयाने परदेशातील तंत्रज्ञान विद्यापीठांसह तसेच भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि इतर प्रतिष्ठित संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत. या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक व स्पर्धात्मक शिक्षणाची संधी उपलब्ध होत असून त्यांना रोजगारक्षम बनविण्यात मदत होत आहे.


या यशाबद्दल प्रा. रामदास झोळ यांनी संस्थेच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर, प्राचार्य डॉ. एस. ए. पाटील, संचालक डॉ. श्रीकांत साळुंके तसेच सर्व कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages