शंकर बटगिरी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 6, 2026

शंकर बटगिरी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

 शंकर बटगिरी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनचे सल्लागार शंकर (अण्णा) नारायण बटगिरी यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा बसवेश्वर मेडिकल फाऊंडेशन व न्यू लाईफ मेडिको सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने राजेंद्र चौक येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन डॉ. प्रकाश घटोळे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नीलकंठेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव आडकी, माजी विश्वस्त व संचालक श्रीनिवास बंदगी, प्रेसिडेंट सुनिल धुळम, अंबादास नादरगी, बालमणी कस्सा, लक्ष्मीकांत आडकी, प्रशांत आरकेल, लखन मिठ्ठा, प्रशांत दंडगळ, विद्या सिंगम तसेच समाजातील अनेक बांधव उपस्थित होते.
या शिबिरात एकूण ५२ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी १२ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. उपस्थित सर्व रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी शंकर (अण्णा) बटगिरी यांनी उपस्थित मान्यवर, वैद्यकीय पथक व नागरिकांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages