सोलापुरात आरटीओची धडक मोहीम; ५७ रिक्षांवर कारवाई, ३३ जप्त
आरटीओकडे विनापरवाना रिक्षा चालवणे, आवश्यक कागदपत्रांशिवाय वाहन चालवणे, तसेच बेफिकीर आणि वेगाने वाहन चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
या मोहिमेसाठी आरटीओच्या ६ पथकांसह एसटी पथक तैनात करण्यात आले होते. शहरातील विविध भागांत अचानक तपासणी करत मोटार वाहन कायद्यानुसार नियमभंग करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली.
मोहीम सुरूच राहणार
ही कारवाई पुढील काळातही सुरू राहणार असल्याचे आरटीओने स्पष्ट केले आहे. वाहनधारकांनी परवाना व आवश्यक कागदपत्रे वैध ठेवून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
सोलापूर शहरासह पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, बार्शी, अक्कलकोट, दक्षिण व उत्तर सोलापूर या सात तालुक्यांत सुमारे १७ हजार रिक्षा कार्यरत आहेत. यापैकी अनेक रिक्षांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने ही मोहीम हाती घेण्यात आली.
.png)
No comments:
Post a Comment