प्रशासनाच्या‎ त्रुटींवर किसन‎ जाधव यांची‎ मांडणी,‎ पाणीप्रश्नावरही‎ भूमिका स्पष्ट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 1, 2026

प्रशासनाच्या‎ त्रुटींवर किसन‎ जाधव यांची‎ मांडणी,‎ पाणीप्रश्नावरही‎ भूमिका स्पष्ट

 प्रशासनाच्या‎ त्रुटींवर किसन‎ जाधव यांची‎ मांडणी,‎ पाणीप्रश्नावरही‎ भूमिका स्पष्ट



सोलापूर‎ (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या 2026-27‎ या‎ आर्थिक वर्षासाठी 1449‎ कोटी 71 लाख‎ 93 हजार 401‎ रुपयांचे अंदाजपत्रक सोमवारी‎ सर्वसाधारण‎ सभेत मंजूर करण्यात‎ आले.‎ स्थायी‎ समिती सभापती‎ रंजिता चाकोते‎ यांनी सभागृहात हा‎ अर्थसंकल्प सादर‎ केला. शहराच्या‎ सर्वांगीण‎ विकासाच्या दृष्टीने‎ सादर करण्यात‎ आलेल्या‎ या बजेटमध्ये पायाभूत‎ सुविधा,‎ स्वच्छता,‎ पाणीपुरवठा,‎ रस्ते‎ विकास‎ आणि‎ सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्यात‎ आले‎ आहे.‎ यावेळी भाजपा नगरसेवक किसन जाधव यांनी‎ बजेटवर आपली‎ भूमिका‎ मांडताना‎ प्रशासनाच्या कार्यपद्धतीतील काही‎ त्रुटी‎ सभागृहात‎ अधोरेखित‎ केल्या.‎ महापौर विनायक‎ कोंडयाल, उपमहापौर‎ ज्ञानेश्वरी‎ देवकर,‎ शहराध्यक्ष‎ रोहिणी‎ तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र काळे आणि स्थायी‎ समिती‎ सभापती रंजिता‎ चाकोते‎ यांच्या नेतृत्वाचे कौतुक‎ करत‎ त्यांनी‎ हे बजेट सोलापूरच्या प्रगतीसाठी‎ महत्त्वपूर्ण‎ ठरेल,‎ असा‎ विश्वास‎ व्यक्त केला. मागील साडेचार‎ वर्षांच्या प्रशासकीय कालावधीचा उल्लेख करताना‎ जाधव‎ यांनी‎ महसूल‎ संकलन अपेक्षेप्रमाणे‎ झाले नसल्याचे‎ नमूद केले.‎ तसेच‎ त्या कालावधीत घेतलेल्या‎ निर्णयांची‎ सविस्तर‎ माहिती‎ सभागृहासमोर‎ सादर करण्याची आवश्यकता त्यांनी‎ व्यक्त‎ केली. याशिवाय, प्रशासकीय कालावधीत डीपी प्लॅन शासनाकडे पाठवण्यात आला असला‎ तरी‎ त्यासाठी सभागृहाची मंजुरी‎ घेणे‎ आवश्यक असल्याचे‎ त्यांनी‎ स्पष्ट केले. प्रशासनाने सदस्यांना‎ विश्वासात‎ घेऊन डीपी प्लॅन‎ पुन्हा‎ शासनाकडे‎ पाठवावा, अशी‎ मागणी त्यांनी केली.‎ तसेच‎ अद्याप‎ प्रशासनाच्या वतीने‎ आवश्यक‎ रिव्हिजन करण्यात‎ आलेले नसून ते‎ तात्काळ‎ करावे,‎ अशी‎ मागणीही त्यांनी‎ केली. गेल्या साडेचार‎ वर्षांच्या प्रशासकीय कालावधीत सोलापूर‎ शहराच्या विकासासाठी‎ घेतलेले निर्णय तसेच‎ शासनाकडे पाठवलेले‎ प्रलंबित‎ प्रस्ताव यांची‎ पुस्तिका‎ तयार‎ करून‎ येत्या‎ दोन‎ महिन्यांत‎ सभागृहात‎ सादर‎ करावी, असेही त्यांनी‎ सांगितले. दरम्यान,‎ मूलभूत कामांमधून‎ मिळणाऱ्या उत्पन्नाचा हेड पूर्वीच्या‎ अंदाजपत्रकात नमूद‎ होता; मात्र‎ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे‎ तो वगळण्यात‎ आल्याने महापालिकेला‎ सुमारे 100 कोटी‎ रुपयांचा फटका‎ बसल्याचा आरोप जाधव यांनी केला.‎ पाणीप्रश्नावर बोलताना काँग्रेसचे‎ चेतन‎ नरोटे यांच्या‎ टीकेला‎ उत्तर देताना‎ जाधव म्हणाले‎ की, सोलापूर‎ शहराला‎ सुरळीत‎ पाणीपुरवठा व्हावा‎ यासाठी‎ आमदार देवेंद्र कोठे यांच्या‎ पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‎ यांनी उजनी ते सोलापूर दुहेरी‎ पाईपलाईन प्रकल्पासाठी‎ 892‎ कोटी‎ रुपयांचा निधी मंजूर‎ केला‎ आहे. या‎ प्रकल्पामुळे‎ भविष्यात पाणीपुरवठा सुधारण्यास‎ मदत‎ होईल,‎ असा‎ विश्वास‎ त्यांनी‎ व्यक्त‎ केला पक्षीय राजकारण‎ करण्याऐवजी‎ विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष‎ केंद्रित करणे‎ गरजेचे‎ आहे, असा संदेश‎ देत जाधव‎ यांनी‎ विरोधकांना टोला‎ लगावला.‎ नव्या‎ उत्पन्न‎ स्रोतांचा शोध घेण्यावर भर देणारे हे बजेट‎ महापालिकेला आर्थिकदृष्ट्या‎ सक्षम‎ बनवण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी‎ स्पष्ट‎ केले.‎

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages