डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रवादीकडून अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 15, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रवादीकडून अभिवादन

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रवादीकडून अभिवादन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सोलापूर शहरच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना सन्मानाची वागणूक देत त्यांच्यात स्वाभिमानाची जाणीव निर्माण करणारे तसेच मानवतावादी विचारांची पायाभरणी करणारे डॉ. आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सर्वांना समान न्यायाचा संदेश दिला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचे योगदान देशासाठी अत्यंत मोलाचे असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
या अभिवादन कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष संतोष पवार, व्ही.जे.एन.टी. अध्यक्ष रुपेश भोसले, प्रज्ञासागर गायकवाड, शामराव गांगर्डे, ओबीसी सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद, कार्याध्यक्ष अय्युब शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages