सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये सामाजिक समतेचा संदेश; फुले-आंबेडकर जयंती साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 15, 2026

सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये सामाजिक समतेचा संदेश; फुले-आंबेडकर जयंती साजरी

 सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये सामाजिक समतेचा संदेश; फुले-आंबेडकर जयंती साजरी





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तसेच एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव येथे सामाजिक न्यायाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी तसेच महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ११ एप्रिल रोजी स्वतंत्रपणे विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यावर आधारित मनोगते व विचार मांडले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव व सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव, सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर माननीय संजय नवले यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात महात्मा फुले यांच्या शिक्षणप्रेमी व स्त्रीशिक्षणातील योगदानाचा गौरव करत विद्यार्थ्यांना समता, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व पटवून दिले.

त्यानंतर १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली अर्पण करून झाली. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याला अभिवादन केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय नवले यांनी आपल्या मनोगतात संविधान, समानता आणि सामाजिक न्याय यांचे महत्त्व अधोरेखित केले.

दोन्ही कार्यक्रम सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज आणि एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात साजरे झाले. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाचनाच्या सवयीवर विशेष भर देण्याचे आवाहन केले. आजच्या डिजिटल युगात केवळ रिल्स आणि क्षणिक मनोरंजनाकडे आकर्षित न होता, ज्ञानवृद्धीसाठी वाचन हीच खरी गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. महापुरुषांचे विचार केवळ ऐकण्यात किंवा साजरे करण्यात अर्थ नाही, तर ते आचरणात आणण्याचा प्रत्येकाने निश्चय केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच महापुरुष हे कोणत्याही एका समाजाचे किंवा धर्माचे नसून ते संपूर्ण देशाचे असतात, हा संदेश त्यांनी ठळकपणे मांडला.

यावेळी विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. शौर्य नवले, प्रसन्न रत्नाकर, यशोदीप शिंदे आदी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या मनोगतातून बाबासाहेबांविषयीचा आदर आणि प्रेरणा स्पष्टपणे जाणवत होती. कार्यक्रमामुळे उपस्थित सर्वांना बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.

यावेळेस सिंहगडच्या सीआरटीडीचे संशोधन संचालक प्रा. एस एच पवार, पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका शाहीन शेख, उपमुख्याध्यापक प्रकाश नवले, ग्रंथपाल जी. एच‌. घोगले, विद्यानंद बाबर, क्लर्क नवनाथ भडंगे, जनसंपर्क अधिकारी रामकृष्ण लांबतुरे, शिपाई सचिन भानवसे आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages