डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार
माढा (कटूसत्य वृत्त):- थोर महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे महान कार्य व विचार युवा पिढीने आचरणात आणणे आवश्यक आहे.युवकांनी दर्जेदार पुस्तके,साहित्य व वृत्तपत्रे वाचून वाचन संस्कृती जोपासली पाहिजे.वाईट व्यसनापासून दूर राहिले पाहिजे.उच्च शिक्षण देऊन मुलांमुलींना सक्षम व आत्मनिर्भर बनविले पाहिजे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे वाचन कौशल्य व स्मरणशक्ती सुदृढ ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला पाहिजे.प्रत्येकाने जीवनातील यशस्वीतेसाठी पोटाची भूक भागवताना ज्ञानाचीही भूक वाढवावी असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते रोहित भडकवाड यांनी केले.
ते विठ्ठलवाडी ता.माढा येथे श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालय व महात्मा फुले प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मंगळवारी 14 एप्रिल बोलत होते.
प्रास्ताविक आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले.
सुरुवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व इतर थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन वक्ते रोहित भडकवाड,चेअरमन अनिलकुमार अनभुले व अध्यक्ष रामचंद्र भांगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी केंद्रीय नवोदय विद्यालयासाठी व शासकीय सेवेत निवड झालेल्या,टीईटी व सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षक व भावी शिक्षकांचा व नूतन विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांचा संयोजकांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.मोहन शेगर,सेवानिवृत्त उपशाखा प्रबंधक मोहन कदम,बाळू गुंड,चेअरमन अनिलकुमार अनभुले,तंटामुक्ती अध्यक्ष अरुण मोरे, उपलेखापरीक्षक सुहास शिंगाडे,उपसरपंच हनुमंत जाधव,वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे,सचिव नेताजी उबाळे,हनुमंत पाटील, भिमराव शिंगाडे,अर्जून माने, दिपक गव्हाणे,सुधीर गुंड,माया माने,कलावती नागटिळक, धनश्री नागटिळक,ऋषाली नागटिळक,उषा गाडे,अंकुश डूचाळ,गणेश नागटिळक, धनाजी सस्ते,सुशेन भांगे, किशोर गुंड,पोलीस पाटील बालाजी शेगर,सतीश गुंड, भिवाजी जाधव,समाधान कोकाटे,दिनेश गुंड,सुशेन मुळे,गोरख शेगर, ग्रंथपाल अमोल जाधव,रवींद्र शेंडगे, अविनाश माने,भिमराव नागटिळक,नवनाथ शेरखाने, हनुमंत नागटिळक,कैलास गाडे,बबलू नागटिळक,अंकुश नागटिळक,बालाजी गाडे यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सब पोस्ट मास्तर अंकुश डूचाळ यांनी केले. आभार गणेश नागटिळक यांनी मानले.
.png)
No comments:
Post a Comment