सोलापूर महानगरपालिकेत आता 'कलर कोड' पार्किंग!
बेशिस्त वाहनधारकांना लगाम, आयुक्तांचे नवे आदेशसोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका परिसरात येणाऱ्या नागरिकांची आणि कर्मचाऱ्यांची वाहने आता शिस्तबद्ध पद्धतीने पार्क केली जाणार आहेत. पालिकेच्या मुख्य इमारतीसह (इंद्रभुवन परिसर) आजूबाजूला होणारी वाहनांची गर्दी आणि विद्रुपीकरण रोखण्यासाठी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी नवीन 'पार्किंग नियोजन' जाहीर केले आहे.
QR कोड आणि कलर कोडची सक्ती
महानगरपालिकेने आता प्रत्येक विभागासाठी विशिष्ट 'कलर कोड' आणि 'QR कोड' असलेले पास बंधनकारक केले आहेत. संगणक विभागामार्फत सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी आणि पत्रकारांच्या वाहनांची नोंदणी करून त्यांना पार्किंग कलर कोडप्रमाणे QR कोड असलेले पास दिले जातील.
असे असेल पार्किंग नियोजन
तपकिरी रंग: प्रतिनियुक्तीवरील अधिकारी (अतिरिक्त आयुक्त ते सहाय्यक आयुक्त व इतर विभाग प्रमुख).
नारंगी रंग: मा. पदाधिकारी, मा. सदस्य आणि पत्रकार (कौन्सील हॉल शेजारी).
आकाशी निळा: मनपा मधील इतर अधिकारी (ICCC शेजारील जागा).
जांभळा रंग: नगर अभियंता, नगर रचना व इतर विभागाचे कर्मचारी.
हिरवा रंग: लेखा विभाग आणि सा.प्र. विभाग कर्मचारी.
नागरिकांसाठी: हुतात्मा स्मृती मंदिर व मनपाच्या मागील बाजूस (ICCC शेजारी) पार्किंग व्यवस्था असेल.
सुरक्षा आणि देखरेख
पार्किंगच्या ठिकाणी शिस्त लावण्यासाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव सर्व पार्किंग झोनमध्ये CCTV कॅमेरे लावले जाणार असून नगर अभियंता विभागाकडून वाहने लावण्यासाठी पांढरे पट्टे ओढले जातील.
या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व खातेप्रमुखांना दिल्या आहेत.
.png)
No comments:
Post a Comment