जनगणना 2027 साठी सोलापूरमध्ये प्रशिक्षण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 24, 2026

जनगणना 2027 साठी सोलापूरमध्ये प्रशिक्षण

 जनगणना 2027 साठी सोलापूरमध्ये प्रशिक्षण


पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने होणार जनगणना

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जनगणना 2027 बाबतीत प्रगणानं (कर्मचारी) आणि पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाद्वारे जनगणना 2027 बाबतीतील कामकाजाची माहिती व कसे जनगणना आपल्या पार पाडायचे आहे याबाबतीतील प्रशिक्षणासाठी सर्व प्रगनं व पर्यवेक्षक यांना बोलावून प्रशिक्षण आयोजित केल्या गेले होते यादरम्यान माहिती देण्यात आली की सदर जनगणना ही 16 वी जनगणना आणि भारताचा 155 वर्षाचा जनगणनेचा वारसा आहे लास्ट ची जनगणना ही 2018 रोजी 2018 दरम्यान केली गेली होती पुढील जनगणना ही 2021 च्या आसपास नियोजित होती परंतु कोरोना कालावधी असल्याकारणाने सदरील जनगणना होऊ शकली नाही या कारणामुळे 2026 27 या कालावधी दरम्यान सदरचे जनगणनेचे आयोजन केले आहे आणि महत्त्वाचे पाहायला गेल्यास यावेळी जनगणना ही पारंपारिक मॅन्युअली पद्धतीने न होता यावेळी डिजिटल प्रणाली द्वारे जनगणना केली जाणार आहे. एच एल ओ या अँप द्वारे जनगणना केली जाणार आहे. एक मे ते 15 मे या दरम्यान नागरिकांना जनगणना करता येणार आहे. आणि 16 मे ते 15 जून या दरम्यान द्वारे जनगणना केली जाईल. त्या संबंधित प्रकरणांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी जनगणना संदर्भात सुरू असलेल्या शिबिरामध्ये उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी जनगणनेचे राष्ट्रीय विकासातील महत्त्व अधोरेखित करताना अचूक व विश्वसनीय माहिती संकलन हेच नियोजनाचे भक्कम अधिष्ठान असल्याचे सांगितले.तसेच, जनगणना प्रक्रियेदरम्यान नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, घराघरात जाऊन माहिती संकलन करताना नागरिकांशी सौजन्याने वागावे, तसेच कोणतीही माहिती अपूर्ण किंवा चुकीची राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या शिबिरामध्ये जनगणनेच्या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती, आवश्यक कागदपत्रे, माहिती संकलनाची पद्धत तसेच उद्भवणाऱ्या अडचणींवर उपाय याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य करून अचूक माहिती द्यावी, असे आवाहनही आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी यावेळी केले.यावेळी अतिरिक्त आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी संदीप कारंजे, म उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी  आशिष लोकरे, सहायक आयुक्त तथा चारच अधिकारी  गिरीश पंडित, माननीय सहाय्यक आयुक्त तथा चार्ज अधिकारी शशिकांत भोसले, जिल्हा जनगणना समन्वय अजित बांड (जनगणना कार्यालय मुंबई), सहाय्यक चार्ज अधिकारी/विभागीय अधिकारी- सरकाजी, सहाय्यक चार्जे अधिकारी/विभागीय अधिकारी - सुनिता हिबारे सूत्रसंचालन श्रीमती रूथ भंडारे. व सर्व प्रकरण व प्रशिक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages