आधी थोर महापुरूषांच्या पुतळ्यांचा प्रश्न मार्गी लावा आणि नंतर माजी आमदारांचे पुतळे उभे करा - गणेश अंकुशराव
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-पंढरपूर नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत पंढरपुर विधानसभा मतदारसंघाच्या सर्व दिवंगत आमदारांचे पुतळे एकाच ठिकाणी उभे करण्याचा ठराव मंजुर झाला. यानंतर आता पंढरीतील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी मात्रं वेगळीच मागणी केली आहे. पंढरपूर शहरात आधी विविध महापुरूषांचे व थोर संतांचे पुतळे उभे करा आणि यानंतर दिवंगत आमदारांचे पुतळे उभे करा, अशी मागणी गणेश अंकुशराव यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रसिध्दी माध्यमांना एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी माहिती दिली आहे की, गेल्या कित्येक वर्षांपासून पंढरपुरात राजमाता जिजाऊ मॉंसाहेब, आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकांचा प्रश्न रखडेला आहे. शासनाने मंजुरी देऊनही आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या चंद्रमागेतील स्मारकासंदर्भात कोणत्याही हालचाली होत नाहीत, राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासंदर्भातही प्रगती नाही आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे कामही प्रगती पथावर नाही.
त्यामुळे पंंढरपूर नगरपरिषद प्रशासनाने राजमाता जिजाऊ, देशासाठी फासावर गेलेले वीर शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर लहूजी वस्ताद, क्रांतीवीर उमाजी नाईक, महात्मा बसवेश्वर, मौलाना आझाद, वीर शिवा काशीद यासह भुवैकूंठ पंढरी नगरीची महती जगभर पसरविणारे विविध महान संतांची स्मारकं पंढरपुरमध्ये उभे करणं आवश्यक आहे. त्यामुळे प्राधान्याने हे सर्व पुतळे योग्य ठिकाणी उभा करा आणि यानंतर सर्व दिवंगत आदरणीय आमदारांचे पुतळे उभे करा. अशी मागणी गणेश अंकुशराव यांनी केली असुन जर याची दखल नगरपरिषद प्रशासनाने गांभिर्याने घेतली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू करू. असा इशारा ही त्यांनी दिला आहे.
.....
.......
मा.संपादक, पत्रकार साहेब कृपया वरील वृत्त आपल्या लोकप्रिय प्रसिध्दी माध्यमावर प्रसिद्ध करुन सहकार्य करावे ही नम्र विनंती.
कळावे ,
आपला
गणेश अंकुशराव
मोबाईल: +91 93702 71730

No comments:
Post a Comment