सोलापूरहून उड्डाणांना भरभरून प्रतिसाद;
फ्लाय ९१ ने मानले आभार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीने शहरातील हॉटेल लोटस येथे आयोजित विशेष बैठकीत फ्लाय ९१ एअरलाईन्सचे बाघेश्वर यादव, जनरल मॅनेजर (सेल्स) यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. या बैठकीत सोलापूरच्या औद्योगिक आणि व्यावसायिक विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली.
या प्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे गवरनिंग कॉन्सिल सदस्य व सिव्हिल एव्हीएशन समितीचे को चेअरमन केतनभाई शहा, उद्योजक व महाराष्ट्र चेम्बर चे गवर्निंग सदस्य संजीव पाटील यांच्यासह सोलापूर विकास मंचाचे सदस्य, तसेच शहरातील विविध क्षेत्रांतील नामवंत उद्योजक, संस्था व संघटनांचे पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चाय पे चर्चा बैठकीदरम्यान फ्लाय ९१ एअरलाईन्सच्या प्रतिनिधींनी सोलापूर ते गोवा आणि हैद्राबाद या विमानसेवांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सोलापूरकरांचे मनापासून आभार मानले. तसेच, भविष्यात आणखी नवीन मार्ग सुरू करण्याबाबत सकारात्मक संकेतही देण्यात आले.ह्या बैठकीत आय एम ए च्या अध्यक्ष डॉ मंजुषा शहा,डॉ मिलिंद शहा,चिंचोळी एम आय डी सी चे उपाध्यक्ष सूत्रावे, विकास मंच चे योगीन गुज्जर,विजय यादव,दत्ता अंबुरे,झाम्बरे,जिल्ह्यातील सर्व तिकीट एजन्ट्स,सोलापूर चेम्बर चे सचिव शहा,बच्चूवार,चादर टॉवेल निर्यातदार व व्यापारी उपस्थित होते.
या बैठकीमुळे सोलापूरच्या हवाई संपर्कात वाढ होण्यास चालना मिळणार असून,
जर सोलापूर विमानतळ हे उड्डाण योजने अंतर्गत सुरू झाल्यास तिकीट दर निम्याने कमी होतील,,त्या साठी मुख्यमंत्री, खासदार व पालकमंत्री यांनी प्रयत्न केले पाहिजे, याचा उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
स्वागत संजीव पाटील प्रास्ताविक केतनभाई शहा यांनी तर आभार प्रदर्शन नेक्शस ट्रॅव्हल्स चे तरंग शहा यांनी केले.

No comments:
Post a Comment