राजश्री चव्हाण यांचा एकच ध्यास प्रभाग २६ चा सर्वांगीण विकास
परंतु सदरचा रस्ता उखडला गेल्याने नागरिकांना त्रास होत होता. ही बाब त्या नगरातील नागरिकांनी कर्तव्यदक्ष माजी नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्याने. तातडीने ही बाब सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. सदर जोडणारा रस्ता पावसाळ्यापूर्वी करण्यात यावा म्हणून समक्ष कळविले होते त्याची दखल घेऊन लगेच लक्ष्मी कंट्रक्शन कडून कृष्णा कॉलनी मधील रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली व डांबरीकरण करण्यात आले तसेच दोन ५ कार्यालय कडून ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावर झाडी झुडपी वाढली होती ती काढण्यात आली आणि ज्या ठिकाणी पावसामुळे चिखल होत होते तेथे मुरूम टाकून रोलिंग करण्यात आली त्यामुळे वरील नगरातील ज्येष्ठ नागरिक,महिला वर्ग, विद्यार्थी व स्कूल बस चालवणारे चालक यांनी सुटकेचा निस्वास सोडला असून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही वारंवार सदर समस्या बाबत सोलापूर महानगरपालिका, झोन कार्यालय, व नव्याने निवडून गेलेले नगरसेवक यांना व्यथा सांगून ही मनावर घेत नव्हते परंतु माजी नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांना केवळ फोनद्वारे सदर समस्या सांगितल्यानंतर समक्ष पाठपुरावा करून सोलापूर महानगरपालिका आयुक्त, महापौर, सभागृह नेता, यांच्याकडे यशस्वी पाठपुरावा केल्यामुळे आमच्या समस्या दूर झाल्या आहेत तसेच ओम गर्जना चौक ते बॉम्बे पार्क पर्यंतचा रस्ता ड्रेनेजसाठी खोदून ठेवला आहे तो व्यवस्थित करून द्यावा एवढी एक बिकट समस्या आहे ते ही माजी नगरसेविका सौ. राजश्री चव्हाण ह्याच करू शकतात असे मनोगत व्यक्त केले. व यशस्वी पाठपुरावा करून समस्या सोडवल्याबद्दल मनापासून आभार मानले.
सदर समस्यासाठी झोन ५ कार्यालयाला कडील मुकादम बाळासाहेब गोतसुर्वे, देशमुख, कट्टीमणी, लोंढे, यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
.png)
No comments:
Post a Comment