वसतिगृह संघटनेच्या वतीने सभापती संस्कृती सातपुते यांचा सत्कार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा अनुदानित वसतिगृह संस्था चालक संघटनेच्या वतीने समाज कल्याण विभागाच्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल मा. संस्कृतीताई सातपुते याचा सत्कार संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य महेश सरवदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्राचार्य महेश सरवदे यांनी अनुदानित वसतिगृहाच्या संदर्भात माहिती दिली.
मा. सभापती संस्कृतीताई सातपुते म्हणाल्या की,अनुदानित वसतिगृहासंबधीचे कोणते ही काम प्रलंबित राहणार नाही.असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार,सतीश दरेकर,अशोक भांजे, राजकुमार हंचाटे,माजी नगरसेवक म्हाळप्पा सुरवसे, व मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment