शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे परीक्षा मानधनाचे दर सुधारित करा
कॉलेज कर्मचारी युनियनची विद्यापीठाकडे मागणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-
महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे परीक्षा मानधनाचे दर सुधारित करावे, अशी मागणी कॉलेज कर्मचारी युनियने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडे केली आहे.
याचे निवेदन विद्यापीठाचे परीक्षा व मुल्यमानपन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांना युनियनच्या वतीने देण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, उपकुलसचिव डॉ. उमराव मेटकरी, सिनेट सदस्य अजितकुमार संगवे, कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले, सचिव राजेंद्र गिड्डे, हनुमंत कारमकर आदी उपस्थित होते.
युनियनने दिलेल्या निवेदनात असे नमूद आहे की, आय.टी. समन्वयक, लिपीक, परिचर, बेलमन व नाईट वॉचमन तसेच गोपनीय भत्त्यामध्ये 2019-20 पासून या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात कोणतीही वाढ अथवा सुधारणा केलेली नाही. दरम्यानच्या काळात महागाई, कामाचा वाढलेला व्याप व जबाबदाऱ्या लक्षात घेता विद्यमान दर कालबाह्य ठरत आहेत. तरी वर्तमान परिस्थितीचा सखोल विचार करून सुधारित दर निश्चित करावे.
No comments:
Post a Comment