आरोग्य विज्ञान विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
नाशिक (कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. बोधिकिरण सोनकांबळे यांनी प्रतिमेस अभिवादन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील, उपकुलसचिव डॉ. सुनिल फुगारे यांनी प्रतिमेस अभिवादन केले.
याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे, डॉ. प्रमोद पाटील, श्री. संदीप महाजन, श्री. संतोष कोकाटे, श्री. अजित डेरे, श्री. आबाजी शिंदे, श्री. रत्नाकर काळे, श्रीमती सानिया भालेराव, श्रीमती रचना काटकर, श्री. शैलेंद्र जमदाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी, डॉ. सचिन गायकवाड, श्री. राजेंद्र शहाणे, श्री. सचिन धेंडे, श्री. अविनाश सोनवणे, श्री. किशोर जोपळे, श्री. सतीश केदारे, श्री. नाना ढवळे, श्री. ज्ञानेश्वर देशमुख, श्री. ज्ञानेश्वर बांगर, श्री. अक्षय गांगुर्डे, श्री. हरिष परदेशी, श्री. शांताराम गायकवाड, श्री. गोरक्षनाथ रामटेके, श्री. रोशन चक्रवर्ती, श्री. पुष्कर त`हाळ, श्री. कृष्णा भवर, श्री. राजू दिवे, श्री. ज्ञानेश्वर पाथरे, श्री. जगदीश सुंदर्डे, श्री. अक्षय मरकड, श्री. कुलदीप खांडेकर, श्री. शांताराम गुंजाळ, श्री. दिलीप राजपूत आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment