डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त पंढरपूर सकल हिंदू खाटीक समाज यांच्यावतीने अभिवादन
पंढरपूर(कटूसत्य वृत्त):-भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त पंढरपूर सकल हिंदू खाटीक समाज यांच्यावतीने पंढरपूर शहरातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष राजेंद्र ताठे, माजी नगरसेवक डि.राज सर्वगोड यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमनाथ काथवटे, सुभाष जवारे, हरि आदमाने, रवि इंगोले, सोनू इंगोले, रमेश काथवटे, माऊली आदमाने, उमेश ताडे, संतोष ताठे, निलेश खडके, नितीन खडके, रमेश ताठे, नागेश ताडे, नरेंद्र इंगोले यांच्यासह सकल हिंदू खाटीक समाजातील मान्यवर उपस्थित होते.
राजेंद्र ताठे म्हणाले की, सकल हिंदू खाटीक समाजाच्या वतीने अनेक वर्षे वर्षापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेतला जात असतो. त्यांच्या विचारांवर चालून समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment