निक्षय आठवडा स्पर्धेत सोलापूर महानगरपालिका प्रथम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, April 11, 2026

निक्षय आठवडा स्पर्धेत सोलापूर महानगरपालिका प्रथम

 निक्षय आठवडा स्पर्धेत सोलापूर महानगरपालिका प्रथम


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सन २०२४ आणि २०२५ रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य टीबी सेल राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेले महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट टीबी एसीएसएम अवॉर्ड २०२५-२०२६ नुकतेच जाहीर झाले. यामध्ये शहर ‌क्षयरोग विभाग सोलापूर महानगरपालिका यांनी प्रथम क्रमांक पटकाविला
       राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत शंभर दिवसीय टीबी मुक्त भारत अभियानामध्ये निक्षय आठवडा स्पर्धेत प्रथम तसेच निक्षय दिवा स्पर्धेत शहर क्षयरोग विभागास उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले  या दोन उपक्रमांची स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेमध्ये शहर ‌क्षयरोग केंद्राने योग्य नियोजन करून शहरातील कारखाने, जोखीम ग्रस्त भागामध्ये शिबिरे, विविध शाळा , महाविद्यालयामध्ये निबंध स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा , कविता स्पर्धा आयोजित केल्या तसेच नाविन्यपूर्ण कल्पना वापरून टीबी आजाराविषयक असलेले समज गैरसमज याबाबत  मोठ्या प्रमाणात जनजागृती करून समाज माध्यमाद्वारे आयईसी करून व्यापक जनप्रसिद्ध दिली आणि समुदायाचा सहभाग वाढविला सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्हे महानगरपालिका यांनी सहभाग नोंदवला.
या उत्कृष्ट, सांघिक कामगिरी बाबत  शहर क्षयरोग विभागाच्या  सर्व कर्मचाऱ्यांचे तसेच आरोग्य विभागातील सर्व नागरी आरोग्य केंद्र, आयुष्यमान आरोग्य मंदिर, आरोग्यवर्धिनी केंद्र,एचबीटी केंद्रातील संपुर्ण स्टाफचे अभिनंदन आयुक्त सोमपा डॉ. सचिन ओंबासे, मा. अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी केले. आरोग्याधिकारी डॉ. राखी माने, मा.शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर यांनी याबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages