टीबी मुक्त भारत अभियानाला बळ; 15 क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात १०० दिवसीय प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान टप्पा-२ दिनांक २४ मार्च २०२६ पासून सुरू झाले आहे .त्यानिमित्ताने लोकसहभागाद्वारे सामाजिक उत्तरदायित्व जपत "सोलापूर प्राईव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन" या संस्थेने शहर क्षयरोग केंद्राकडील 15 क्षयरुग्णांना सहा महिन्याकरीता पोषण आहार किट वाटप केले
या किटमध्ये मटकी एक किलो, हिरवा मूग एक किलो ,सोयाबीन वडी एक किलो ,शेंगादाणे एक किलो, गुळ एक किलो, हिरवा वाटाणा 100 ग्राम, चणा 100 ग्रॅम ,खजूर ५०० ग्रॅम इत्यादीचा समावेश आहे.
समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, दानशूर व्यक्ती ,स्वयंसेवी संस्था, कार्पोरेट संस्था, लोकप्रतिनिधी, समाजसेवक यांनी सोलापूर हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन या संस्थेप्रमाणे निक्षय मित्र बनून क्षयरुग्णांना पोषक आहारासाठी सहाय्य करावे असे आवाहन प्रमुख पाहुणे डॉ. राजाभाऊ येवले( नवी दिल्ली) डॉ. आनंद श्रीधरन (नवी दिल्ली) ,शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अरूंधती हराळकर यांनी केले.
सदर कार्यक्रमात सोलापूर प्राईव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मंठाळे, सचिव डॉ. निशिकांत मस्के ,सदस्य डॉ. प्रकाश घाटोळे ,डॉ.ज्योती चिडगुपकर आणि एनटीईपी कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment