बचेरी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 16, 2026

बचेरी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न

 बचेरी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न 




माळशिरस (कटूसत्य वृत्त):- मौजे बचेरी येथे आज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. जयंती निमित्त पिलीव जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. जयंतीनिमित्त बारामती झटका यूट्यूब चैनल चे संपादक श्रीनिवास कदम पाटील हेही उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा परिषद शाळा बचेरी तील मुलींनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित भाषणे व लेखन या संदर्भातील ग्रंथ प्राध्यापक सदाशिव शिंदे यांचे वतीने सर्व ग्रामस्थांना भेट म्हणून देण्यात आले. तसेच जयंती निमित्त चंद्रकांत जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले व प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे संविधानाचा आदर केला पाहिजे असे सांगितले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या मागणीनुसार प्राथमिक शाळा बचेरी साठी शाळा खोल्या मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे सांगितले. त्याचबरोबर संपादक श्रीनिवास पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व डॉ बाबासाहेबांच्या लिखाण व संविधान मुळे अस्पृश्यता नष्ट झाली असे सांगून याचा ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. प्राध्यापक सदाशिव शिंदे यांनी ग्रामस्थांना आवाहन केले की थोर व्यक्तींचे लिखाण भाषणे वाचावेत व वाचनाचा उपयोग आपल्या मुलांचा शैक्षणिक दर्जा वाढवणेसाठी करावा. याप्रसंगी पोलीस पाटील आण्णासो शिकारे, बचेरी भाजपा अध्यक्ष राम गोरड, उपसरपंच जयवंत भिसे, मा सरपंच मच्छिंद्र थिटे, भारत काटे,  रोहन काटे, लहू माने, मा उपसरपंच मोहन शिकारे,  अमोल काटे, उपायुक्त पशुसंवर्धन विभाग चे मा शामराव कोळेकर, विश्वजीत गोरड पत्रकार मा सरपंच मंगेश पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी शिंदे, मंगेश साठे, श्रीमती कमल काटे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष बिराभाई शिंदे, शामराव वाघमारे, बबलू काटे भजनदास वाघमारे, शिवराम ढवळे, सुनील जाधव , सौ रतन नवगण, पांडुरंग भिसे  तसेच ग्रामस्थ युवक महिला शालेय विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी आभार प्रा सदाशिव शिंदे यांनी मांडले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages