नरेंद्र गायब, सिलेंडर गायब” : LPG टंचाईवर संसद परिसरात काँग्रेस पक्षाच्या खासदारांसह विरोधकांचे आंदोलन; खासदार प्रणिती शिंदे यांचा सहभाग - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 13, 2026

नरेंद्र गायब, सिलेंडर गायब” : LPG टंचाईवर संसद परिसरात काँग्रेस पक्षाच्या खासदारांसह विरोधकांचे आंदोलन; खासदार प्रणिती शिंदे यांचा सहभाग

नरेंद्र गायब, सिलेंडर गायब” : LPG टंचाईवर संसद परिसरात काँग्रेस पक्षाच्या खासदारांसह विरोधकांचे आंदोलन; खासदार प्रणिती शिंदे यांचा सहभाग



नवी दिल्ली :(कटूसत्य वृत्त):-  देशभरात निर्माण झालेल्या LPG गॅस टंचाईमुळे कोट्यवधी नागरिक त्रस्त झाले असताना, या गंभीर प्रश्नावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी करत नवी दिल्ली संसद भवन परिसरात विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार आंदोलन केले.

या आंदोलनात सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी सहभाग नोंदवत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. “नरेंद्र गायब, सिलेंडर गायब” अशा घोषणाबाजीद्वारे आंदोलनकर्त्यांनी सरकारवर तीव्र टीका केली.


देशातील अनेक भागांत गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गॅस मिळवण्यासाठी लोकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत असल्याची परिस्थिती असून, याबाबत सरकार मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधकांनी यावेळी केला.

जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या प्रश्नावर केंद्र सरकारने तात्काळ उपाययोजना कराव्यात, LPG गॅसचा पुरवठा सुरळीत करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages