भूगोलाचा अभ्यास झाला नसल्यानं पठ्ठ्यानं थेट पेपरचीच केली चोरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 19, 2026

भूगोलाचा अभ्यास झाला नसल्यानं पठ्ठ्यानं थेट पेपरचीच केली चोरी

 भूगोलाचा अभ्यास झाला नसल्यानं पठ्ठ्यानं थेट पेपरचीच केली चोरी




सांगोला पेपर चोरी प्रकरण! 

सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला येथील सांगोला विद्यामंदिर शाळेमधून दोन दिवसापूर्वी चोरीला गेलेल्या भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका आज अखेर पोलिसांना मिळाल्या आहेत. याप्रकरणी दहावीत शिकणाऱ्या एका विधी संघर्ष ग्रस्त अल्पवयीन विद्यार्थ्याची चौकशी केली आहे.

हा सर्व प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे हे कृत्य करणारा विद्यार्थीही दहावीत शिकत असून याच केंद्रावर त्याचा नंबर होता. आज दहावीच्या भूगोलाच्या पेपरला हा पठ्ठ्याही आला होता. मात्र, पेपर सुटल्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी त्याला सोबत घेतल्यावर त्याने या प्रकाराची कबुली दिली आहे.

इतर पेपर चांगले गेले, मात्र भूगोलाचा अभ्यास झाला नसल्याने पेपर चोरल्याती कबुली

इतर पेपर चांगले गेले मात्र भूगोलाचा अभ्यास झाला नसल्याने हे पेपर चोरल्याचे त्यांनी कबूल केले. आज पोलिसांनी या अल्पवयीन विधी संघर्ष ग्रस्त बालकाची त्याच्या पालकांसमोर चौकशी केली असता त्याने अनेक गोष्टी सांगितल्या. चोरी करण्यापूर्वी त्याने या केंद्रावरील स्ट्रॉंग रूमची चांगली पाहणी करुन घेतली होती. पहाटे दोनच्या सुमारास हा मुलगा इलेक्ट्रिक बाइक वर इलेक्ट्रिक कटर घेऊन शाळेत पोहोचला. त्यानंतर त्याने या स्ट्रॉंग रूमला लावलेले कुलूप कटरच्या साह्याने कट केले आणि आत जाऊन प्रश्नपत्रिका असलेली ट्रंक उघडली. त्याने भूगोलाच्या प्रश्नपत्रिका असलेले दोन गठ्ठे आणि तीन कोऱ्या उत्तर पत्रिका आपल्या सोबत घेऊन तेथून तो पुन्हा घरी आला. यातील एक गठ्ठा फोडून त्याने ती प्रश्नपत्रिका पाहिली होती.

50 प्रश्नपत्रिका 3 कोऱ्या उत्तर पत्रिका इलेक्ट्रिक कटर आणि इलेक्ट्रिक बाइक ताब्यात

आज पोलिसांनी या विधी संघर्ष ग्रस्त अल्पवयीन बालकाकडून चोरीला गेलेल्या 50 प्रश्नपत्रिका 3 कोऱ्या उत्तर पत्रिका इलेक्ट्रिक कटर आणि इलेक्ट्रिक बाइक ताब्यात घेतली आहे. या प्रश्नपत्रिका चोरीनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. काल या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आजचा पेपर होणार का हा प्रश्न असताना रात्री उशिरा आज पेपर वेळापत्रकाप्रमाणे घेण्याचा निर्णय बोर्डाने घेतला होता. आज त्यानुसार राज्यात सर्व ठिकाणी दहावीचा शेवटचा हा भूगोलाचा पेपर घेण्यात आला. पेपर चोरणाऱ्या या मुलाने या प्रश्नपत्रिकेचा गैरवापर केला नसल्याची खात्रीही पोलिसांनी चौकशी करून घेतली असल्याचे समजते. आता उद्या नियमानुसार या विधीग्रस्त संघर्ष बालकास बाल न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages