श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे शुक्रवारी हिंदू संमेलनाचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 19, 2026

श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे शुक्रवारी हिंदू संमेलनाचे आयोजन

 श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे शुक्रवारी हिंदू संमेलनाचे आयोजन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे शुक्रवार दि. 20 मार्च रोजी  हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महामंडळाच्या उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  
          श्रीराम नवमीच्या पावन पर्वानिमित्त महामंडळाच्यावतीने उत्सव अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या नेतृत्वाखाली व संस्थापक अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ५१ प्रभू श्रीराम मूर्ती वाटप आणि विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम शुक्रवार, दि. 20 मार्च  रोजी सायंकाळी 5 वाजता, चिल्ड्रन पार्क, वालचंद कॉलेज जवळ, कर्णिक नगर, सोलापूर येथे होणार आहे.या संमेलनास  तेलंगणाचे आमदार राजासिंह ठाकूर, आमदार गोपीचंद पडळकर, समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंदभाऊ एकबोटे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
        यावेळी राम रथाचे आगमन व पूजन सोहळाही होणार आहे. या सोहळ्यास सोलापूर शहर व परिसरातील सर्व रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी केले आहे.
          या पत्रकार परिषदेस आनंद मुसळे, अमित राऊत, शिवराज गायकवाड, सुधीर बहिरवाडे, देविदास मिटकरी, संदीप जाधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages