माऊली पवार यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असता तर समाजाची ताकद वाढली असती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 18, 2026

माऊली पवार यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असता तर समाजाची ताकद वाढली असती

 माऊली पवार यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असता तर समाजाची ताकद वाढली असती


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा समाजावर झालेल्या कथित राजकीय अन्यायाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता अंतर्गत मतभेदांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री , तसेच स्थानिक पदाधिकारी कोठे आणि तडवळकर यांच्या विरोधात भूमिका घेतली असताना, माऊली पवार यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, माऊली पवार यांनी आंदोलनाला पाठिंबा देण्याऐवजी पालकमंत्री यांच्या हस्ते १८ मार्च २०२६ रोजी मराठा समाजातील नगरसेवकांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला आहे. यामुळे समाजात संभ्रम निर्माण झाला असून आंदोलनाची एकजूट कमकुवत होत असल्याची टीका होत आहे.

मराठा आंदोलक यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “माऊली पवार यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असता तर समाजाची ताकद वाढली असती. मात्र त्यांनी उलट मराठा समाजाला पालकमंत्र्यांच्या बाजूला उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.”

तसेच १८ मार्च रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. पहिले सव्वा वर्ष कुणबी मराठा समाजातील अध्यक्ष व्हावा, यासाठी आंदोलनकर्त्यांकडून दबाव टाकला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“जर उद्या कुणबी मराठा अध्यक्ष झाला नाही, तर समाज हे पालकमंत्री आणि माऊली पवार यांच्यातील आर्थिक व्यवहाराचे परिणाम असल्याचे समजेल,” असा गंभीर आरोपही यांनी केला.

दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, उद्याच्या अध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages