अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) :- पवित्र रमजान महिन्यानिमित्त आयोजित ‘दावत-ए-इफ्तार’ कार्यक्रमातून अक्कलकोट शहराने सर्वधर्मसमभाव, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचा आदर्श पुन्हा एकदा राज्यासमोर ठेवला. या कार्यक्रमात विविध धर्मीय नागरिकांनी एकत्र येत सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.
भाजप अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष फैजअहमद उर्फ नन्नू कोरबू मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला आमदार सचिन कल्याणशेट्टी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी अक्कलकोट ही सर्वधर्मीय ऐक्याची भूमी असून, येथे जपली जाणारी एकोप्याची परंपरा भविष्यातही कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी हिंदू व मुस्लिम समाजातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करत सामाजिक ऐक्याचा आदर्श घालून दिला.
कार्यक्रमाला नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, मैंदर्गीच्या नगराध्यक्ष अंजली बाजारमठ, अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड, नगरसेवक महेश हिंडोळे, अविनाश मडीखांबे, कांतू धनशेट्टी, मुस्तफा बळोरगी, उद्योगपती सिद्धाराम टाके, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भिताडे, भाजपा प्रदेश सदस्य शिवसेना जोजन, सागर हिप्परगी, अजित सुतार, अॅड. विजय हर्डीकर, डॉ. रवींद्र बनसोडे, सेवानिवृत्त सपोनि सत्तार शेख, विक्रम शिंदे, माजी नगरसेवक सुनील सिद्धे, मल्लिनाथ आळगी, अंकुश चौगुले आदी उपस्थित होते.
सदर इफ्तार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आईजम्मद कोरबू यांच्या नेतृत्वाखाली शकील नाईकवाडी, रशीद किस्तके, नगरसेवक नाविद डांगे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment