टेंभुर्णीत दिवसाढवळ्या गॅस टाकी चोरी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 26, 2026

टेंभुर्णीत दिवसाढवळ्या गॅस टाकी चोरी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

 टेंभुर्णीत दिवसाढवळ्या गॅस टाकी चोरी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-   सध्या जगात युद्धाचे सावट असल्याने सगळीकडे तुटवडा चालू आहे त्याचाच फायदा घेऊन त्यामुळे भुरटे चोऱ्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे टेंभुर्णी शहरात आता चोरट्यांनी थेट घराच्या आवारातील वस्तूंवरही डल्ला मारण्यास सुरुवात केल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या गॅस टाकी चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेंभुर्णी येथील रहिवासी आम्रपाली विठ्ठल वजाळे यांच्या घराच्या गेटच्या आत ठेवलेली एचपी गॅस कंपनीची टाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना काल रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे ही चोरी भरदिवसा झाल्याने चोरट्यांचा वाढता बिनधास्तपणा स्पष्ट होत आहे.
सदर प्रकरणी आम्रपाली वजाळे यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. या घटनेचा तपास पोलीस नाईक केशव झोळ करत आहेत. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
टेंभुर्णी शहरात यापूर्वीही घरफोडी, चोरी, तसेच वाहनचोरीच्या घटना घडल्या असून, त्यात आता गॅस टाकी चोरीची भर पडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. “घराच्या गेटच्या आत ठेवलेली वस्तूही सुरक्षित नाही, तर मग सुरक्षितता नेमकी कुठे?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे गस्त वाढवण्याची, संशयितांवर कडक कारवाई करण्याची तसेच सीसीटीव्ही यंत्रणा बळकट करण्याची मागणी केली आहे. विशेषतः दुपारच्या वेळीही गस्त घालण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, पोलिसांनीही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, घराबाहेरील मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात, तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
टेंभुर्णीतील वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा बसवण्यासाठी पोलिसांनी केवळ तपासापुरते मर्यादित न राहता प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे अत्यावश्यक असल्याचे मत सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages