श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या पालखीचे पुण्यात मोठ्या उत्साहात स्वागत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 30, 2026

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या पालखीचे पुण्यात मोठ्या उत्साहात स्वागत

 श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या पालखीचे पुण्यात मोठ्या उत्साहात स्वागत



अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अनंत कोटी ब्रम्हांडनायक, राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की, जय...! च्या जय घोषात श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या पालखीचे पुण्यात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पुण्यातील परिक्रमा मार्गावर पालखी पदुकाचे दर्शन घेण्यासाठी शेकडो पुणेकरांनी दुतर्फा गर्दी केलेली होती.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २९ वर्षापासून पालखी पादुका परिक्रमा ही महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा या दोन राज्यात जात असते, श्री क्षेत्र अक्कलकोट येथून नोव्हेंबर २०२५ पासून सुरु झालेली परिक्रमा ही दि. १५ जुलै २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे विसावणार आहे. दरम्यान ही परिक्रमा गेल्या ४ महिन्यात पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा या रा
ज्यातून  तळकोकणातून पुणे येथे पोहोचली आहे. या नंतर नवी मुंबई, बृहन्मुंबई कडे मार्गस्थ होणार आहे. 
 
अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की, जय...! च्या जयघोषात अन्नछत्र मंडळाच्या पालखी पादुका परिक्रमेच्या आगमनाने पुणे शहर भक्तीरसात रंगले असून, श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय घोष, रांगोळीच्या पायघड्या आणि पुष्पवृष्टी पुणेकरांनी उस्पुर्त पणे उत्साहात स्वागत केले.फुलाने सजविलेल्या पालखीच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती. श्री क्षेत्र अक्कलकोट येथून आलेली पालखी मंडईतील श्री शारदा गजानन मंदिरापासून वाजत-गाजत निघाली. शहरातील प्रमुख मार्गावरून शोभा यात्रा काढण्यात आली असून, ठिकठिकाणी भाविकांनी पुष्पवृष्टी व रांगोळ्यांनी पालखीचे स्वागत केले. कार्यक्रमाचे आयोजन अण्णा थोरात, विनायक घाटे, नामदेवराव मोहिते, राजाभाऊ वरखडे, विलास चव्हाण यांनी केले आहे. या प्रसंगी शोभा यात्रा पुणे महानगरपालिकेचे महापौर मंजुषा नागपुरे, आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते तर पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक राघवेंद्र मानकर, अॅड. कुणाल टिळक, नगरसेविका स्वरदा बापट, स्वप्नाली पंडित हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पालखी पादुका दर्शन सोहळा, संस्कृती कार्यक्रम ,पुरस्कार सोहळा संपन्न झाला. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये स्वामी भक्ती गीते हर्षद कुलकर्णी यांचे तर बाळासाहेब परदेशी यांचे साई नवनाथ भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम, योगेश तपस्वी यांचा स्वामी गीत सुगंध, स्वरसमर्थ भक्ती गंधर्व मुकुंद बादरायणी यांनी सदर केले.या बरोबरच श्री स्वामी समर्थ पुरस्कार ज्ञानेश्वर माऊली टाकळकर तर सेवा पुरस्कार दिपक वायकर यांना स.भ.मोहन  बुवा रामदासी, समर्थ रामदास स्वामी मठ क्षेत्र खातगांव जि. अहिल्यानगर, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, पुणे पोलीस उपायुक्त परीमंडल १ ऋषिकेश रावले, पुणे येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष वीरेंद्र किराड, पुणे महानगरपालिका स्थायी समितीहे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला. 

सामुदायिक महाआरती सोहळा हा पुणे म.न.पा. नगरसेविका प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे, मसोबा देवस्थान खारावडेच्या अध्यक्षा मधुरा भेलके या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दरम्यान श्री स्वामी समर्थ मंडपा मध्ये श्री स्वामी समर्थ पादुका अभिषेक सामुदायिक आरती, रक्तदान सोहळा संपन्न झाला. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुण्याचे श्रीपाद थोरात, बाबा रोटे, राजाभाऊ शिर्के, माऊली लोणारे, केंपन्ना नाईक, संदीप चव्हाण, संदीप कोकाटे, सचिन परदेशी, लाला गायकवाड, किशोर म्हस्के, उमेश बने, डॉ. संजय खेडेकर, सुरज थोरात, प्रथमेश घाटे, भगवान बलकवडे, बाळू गौडा, हरीश उर्फ दादा मोरे, नारायणराव चांदणे, नंदू कटके, युवराज चिकणे, सिद्धांत (स्वामी) काजळे, कौशल्य सलीम शेख, सोहम वरखडे, श्री क्षेत्र अक्कलकोटचे महाराष्ट्र पालखी परिक्रमा संयोजक संतोष भोसले, पुरोहित संजय कुलकर्णी आदिजणानी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages