माळशिरस पंचायत समितीच्या वतीने शिखर शिंगणापूर यात्रेनिमित्त भवानी घाटात पाण्याचे टँकर
नातेपुते (कटूसत्य वृत्त):-चैत्र महिन्यात शिखर शिंगणापूर यात्रा मोठ्या प्रमाणात सुरू असून श्री शंभू महादेवाच्या आदर्शनास अनेक भाविक कावडी खांद्यावर घेऊन मराठवाडा विदर्भ कर्नाटक सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद या ठिकाणाहून अनेक भाविक पायी वारी करत असतात पायी वारी करत असताना पिण्याच्या पाण्याची उणीव भासू नये म्हणून म्हणून माळशिरस पंचायत समितीच्या वतीने व माळशिरस तालुका शिवसेनाप्रमुख सतीश सपकाळ यांच्या वतीने शिखर शिंगणापूर यात्रेसाठी पायी चालणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी अनेक ठिकाणी टँकर सुविधा करण्यात आले आहे. तसेच भाविकांना येणाऱ्या अडचणी विषयी पाहणी करून त्या अडचणी विषयी निवारण करण्यात आले आहे. यावेळी पंचायत समिती सभापती दत्ता मगर, शिवसेना तालुकाप्रमुख सतीश सपकाळ,माळशिरस गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे,ग्रामीण पाणी पुरवठा उप अभियंता सदावरे,कनिष्ठ अभियंता अण्णासाहेब आमले,अभिजीत वाघ,कल्याण हुलगे,महेश शिंगटे,पताळे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment