मराठी भवनचे काम सुरू करण्यासाठी मंत्री शेलार यांना निवेदन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 21, 2026

मराठी भवनचे काम सुरू करण्यासाठी मंत्री शेलार यांना निवेदन

 मराठी भवनचे काम सुरू करण्यासाठी मंत्री शेलार यांना निवेदन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पार्क चौकातील शुभराय आर्ट गॅलरीच्या जागेवरील रखडलेल्या मराठी भवनचे बांधकाम तातडीने सुरू करावे अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.
यावेळी कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष अमोल धाबळे, सल्लागार अविनाश महागांवकर, प्रसिध्दी प्रमुख विनायक होटकर, भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, आदी उपस्थित होते.
 महाराष्ट्रातील सोलापूर हे महत्वाचे शहर आहे. मराठी साहित्य, नाट्य,संगीत आणि विविध कला समृध्द करण्यासाठी सोलापूर मधून अनेकांनी योगदान दिले आहे. अनेक प्रतिभावंत साहित्यिक, कलावंत या सोलापूरने महाराष्ट्राला दिले. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमेवर असूनही मराठी भाषेची वृध्दी करण्यात सोलापूर हे अग्रेसर आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर सोलापूरमध्ये मराठी भवन असावे त्यातील एका विभागाला स्वर्गिय दत्ता हलसगीकर यांचे नाव द्यावे अशी अपेक्षा महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने तत्कालीन आमदार आणि विद्यमान खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे व्यक्त करण्यात आली होती त्यानुसार स्व. डॉ.वासुदेव रायते, हास्यसम्राट प्रा.दिपक देशपांडे, प्रशांत बडवे, रवी हलसगीकर यांचे शिष्टमंडळ आ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून मराठी भवनच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. त्यावर सकारात्मकपणे प्रतिसाद देत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर गेल्या 7 ते 8 वर्षापासून मराठी भवनच्या मागणीचा पाठपुरावा करून आ. प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमध्ये मराठी भवन तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी मंजूर करून आणला. त्याबाबतचा आदेशही जिल्हा प्रशासलाना प्राप्त झाला. त्यानुसार बांधकामाला सुरूवात झाली परंतु गेल्या दोन वर्षापासून हे बांधकाम बंद अवस्थेत आहे. त्याचा पाठपुरावा म्हणून आणि मराठी भवन लवकरात लवकर सोलापूरकरांना उपलब्ध व्हावे या हेतुने राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे कार्यक्रमानिमित्त शहाजी पवार यांच्या घरी आले होते त्यावेळी त्यांना मराठी भवनचे बांधकाम तातडीने सुरू करावे यासाठी निवेदन देण्यात आले. त्यावर त्यांनी सोलापूरच्या मराठी भवनचे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्‍वासन दिले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष अमोल धाबळे, प्रसिध्दी प्रमुख विनायक होटकर, सल्लागार अविनाश महागांवकर यांच्या हस्ते हे निवेदन नामदार आशिष शेलार यांना देण्यात आले यावेळी शहाजी पवार, इंद्रजित पवार आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages