सरसकट पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी- चेतनसिंह केदार सावंत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 21, 2026

सरसकट पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी- चेतनसिंह केदार सावंत

 सरसकट पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी- चेतनसिंह केदार सावंत




सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने झोडपल्याने सांगोला तालुक्यातील डाळिंब, द्राक्ष, केळी, आंबा, पेरू यासह इतर फळबागांचे आणि ज्वारी, मका, गहू तसेच पालेभाज्या या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके व फळबागा हातातून जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांचे सरसकट  पंचनामे  करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य चेतनसिंह केदार सावंत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, तहसीलदार बाळूताई भागवत यांच्याकडे केली आहे. 
        सांगोला शहर आणि तालुक्यात दोन दिवस अवकाळी पावसाने तसेच गारपीटीने झोडपल्याने डाळिंब, केळी, द्राक्ष, आंबा, पेरू, सीताफळ, चिकू यासह इतर फळबागा आणि रब्बी हंगामातील ज्वारी, मका, गहू यासह तरकारी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस आणि वादळी वारे यामुळे शेतातील उभी पिके कोलमडून पडली तर द्राक्ष पिकांना घडकुज कुजवा रोगांचा प्रादुर्भाव वाढला. मोहोर अवस्थेत असलेल्या आंब्याच्या बागांनाही ढगाळ वातावरण अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. मोहोर गळून गेल्याने आंबा उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. दुष्काळी परिस्थितीशी झगडत जतन केलेल्या फळबागा अवकाळी पावसाने उद्दवस्त झाल्याने शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट उभा राहिले आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून सरसकट पंचमाने करून भरपाई द्यावी अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य चेतनसिंह केदार सावंत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, तहसीलदार बाळूताई भागवत यांच्याकडे केली आहे. 
      सांगोला तालुक्यात वादळी वारे आणि अवकाळी पावसाळे शेती पिकांचे आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी. अनेक शेतकरी आपली पिके जगवण्यासाठी संघर्ष करत होते. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी, नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी महसूल विभागाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून असा अहवाल तहसील कार्यालयाकडे सादर करून नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य चेतनसिंह केदार सावंत यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages