श्रींचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 21, 2026

श्रींचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

 श्रींचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी दत्तात्रय...! दिगंबरा दिगंबरा.... श्री गुरु दत्ता....! श्रीपाद वल्लभ दिगंबरा....! श्रीक्षेत्र अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय...! श्री अन्नपूर्णा माता की जय..!! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात शुक्रवारी श्रींच्या प्रकट दिनानिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली व विश्वस्त अर्पिताराजे अमोलराजे भोसले व विश्वस्त अनुयाताई संदीप फुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. न्यासाकडून महाप्रसादाच्या उत्कृष्ठ व्यवस्थेने भक्तातून समाधान व्यक्त करण्यात आले. शेकडो  स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

दरम्यान न्यासाच्या महाप्रसाद गृहात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनानिमित्त पाळणा कार्यक्रम शुक्रवारी दुपारी १२ वा. ५ मी. संपन्न झाला. या प्रसंगी न्यासाच्या विश्वस्त अर्पिताराजे अमोलराजे भोसले, विश्वस्त अनुयाताई संदीप फुगे, जयश्रीताई मगर, ज्योतीताई मगर, स्वाती निकम, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, चि. समर्थ संदीप फुगे, सुवर्णा घाडगे, युगंधरा बऱ्हाणपूरे, अनिता गडदे, अस्मिता निकम, भैय्या गडदे यांच्या व स्वामी भक्तांच्या उपस्थितीत पाळणा कार्यक्रम संपन्न झाला. पाळणा गीताबरोबरच मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व विश्वंभर पुजारी यांच्या हस्ते विधिवत पूजा, धार्मिक कार्यक्रम भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाले. श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्रींना नैवेद्य दाखविण्यात आले. महाप्रसादाचा संकल्प अर्पिताराजे अमोलराजे भोसले यांच्या हस्ते सोडण्यात आल्यानंतर महाप्रसादास सुरुवात करण्यात आले. प्रकट दिनानिमित्त सकाळच्या वेळी महाप्रसादालयात सोलापूरच्या भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी प्रकट दिनाच्या वेळी फुलांची व गुलालाची उधळण करण्यात आली. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज कि, जय च्या जय घोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. चांदीच्या पाळण्यासह श्रींच्या पूजेच्या ठिकाणास आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते.

स्वामी भक्तांनी अन्नछत्र मंडळाच्या परिसरात असलेल्या श्री शमी-विघ्नेह गणेश मंदिर, ब्रह्मांडनायक उभी स्वामींची मूर्ती, नियोजित महाप्रसादगृह इमारत, सध्याचे अद्यावत तात्पुरते महाप्रसादालय, कपिला गाय, कारंजा, शिवस्मारक, कार्यरत यात्री निवास-१, यात्रीभुवन-२, अतिथी गृह, आऊटडोअर व इनडोअर जीम, प्रशस्त वाहनतळ, टेकडीवरील श्री समर्थ वाटिका, शिवचरित्र प्रदर्शन हॉल, अग्निशमन, रुग्णवाहिका, आश्रयदाते कक्ष, नवीन सुरु असलेले महाप्रसादालयाचे बांधकामसह हाती घेतलेल्या विविध उपक्रम व व्यवस्थेचे स्वागत करुन न्यासाचे कौतुक केले.

यावेळी राज्याचे गृह राज्य मंत्री ना. योगेश कदम यांचे स्वीय सहायक- प्रदीप गुरव, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रकाश बावीसकर, सानपाडा, नवी मुंबई, मुंबई लोहमार्ग पोलीस चे विशेष शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश देवरे, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, संदीप फुगे, राहुल मगर, सौरभ मोरे, मनोज निकम, रामचंद्रराव घाटगे, अशोकराव पवार, प्रवीण देशमुख, सिद्धेश्वर मोरे, वैभव मोरे, सनी सोनटक्के, रोहित खोबरे, शिवराज स्वामी, निखील पाटील, अतिश पवार, गोटू माने, योगेश कटारे, विराज माणिकशेट्टी, प्रवीण घाटगे, रोहन शिर्के, सतीश महिंद्रकर, शहाजी यादव, बाळासाहेब घाडगे, बाळासाहेब पोळ, नामा भोसले, संभाजीराव पवार, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, सरफराज शेख, मैनुद्दीन कोरबू,  तानाजी पाटील, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, बसवराज क्यार, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, एस के स्वामी, महांतेश स्वामी, सिद्धाराम कल्याणी, मल्लिनाथ कोगनुरे, कल्याण देशमुख, धनंजय निंबाळकर, विशाल घाडगे, रोहित कदम, विठ्ठल रेड्डी, समर्थ चव्हाण, किरण साठे, विनायक भोसले, शुभम सावंत, सागर जाधव, वैभव कामनुरकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

चौकट :
उत्कृष्ठ व्यवस्थापन :
श्रींच्या प्रकट दिनाच्या दिवशी श्रीक्षेत्र अक्कलकोटला आलो असता, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात शेकडो स्वामी भक्त महाप्रसादाकरिता आलेले होते. त्याठिकाणी न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून महाप्रसादाचे उत्कृष्ठ नियोजन व व्यवस्थापन पाहून आम्ही सकल स्वामी भक्त समाधानी आहोत.
  -मोहन जोशी
  जेष्ठ अभिनेते, मुंबई

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages