महिला कुस्ती स्पर्धेसाठी शासनाचा भक्कम पाठिंबा - पालकमंत्री गोरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 31, 2026

महिला कुस्ती स्पर्धेसाठी शासनाचा भक्कम पाठिंबा - पालकमंत्री गोरे

 महिला कुस्ती स्पर्धेसाठी शासनाचा भक्कम पाठिंबा - पालकमंत्री गोरे


 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- हरीभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात चौथी महिला महाराष्ट्र केसरी व वरिष्ठ गट महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तसेच विविध गटातील पुरुष कुस्ती स्पर्धेसाठी 25 लाखाचा निधी जाहीर केला. तर पुढील वर्षीपासून महिला कुस्ती स्पर्धेसाठी 50 लाखाचा निधी देण्याबाबत मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महिला कुस्ती स्पर्धेला शासनाचा भक्कम पाठिंबा असल्याचे सांगितले.

हरीभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात आयोजित महिला महाराष्ट्र केसरी व वरिष्ठ गट महिला राज्यस्तरीय अजिंक्य कुस्ती स्पर्धेच्या समारोप प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते. यावेळी महापौर विनायक कोंड्याल, हिंदकेसरी योगेश दोडके, ट्रिपल महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फड, महाराष्ट्र केसरी मुन्नालाल शेख, समाधान घोडके, नगरसेविका रोहिणी तडवळकर, आयोजक स्वाती अळ्ळीमोरे-साखरे, अक्कलकोट अन्नछत्र ट्रस्टचे अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. 

पालकमंत्री गोरे म्हणाले की, कैलासवासी सिद्धाराम साखरे यांच्या स्मरणार्थ आयोजित ही कुस्ती स्पर्धा महिलांच्या कुस्ती क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. महाराष्ट्रातील रणरागिनींना राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्याचे कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. कुस्तीपटू गीता व बबीता फौगाट यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले असून त्यांच्याप्रमाणे महाराष्ट्रातील महिला खेळाडूही पुढे येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

स्पर्धेतील अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या अमृता पुजारी यांनी महाराष्ट केसरी किताब पटकावला. या स्पर्धेत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले व युवराज केचे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages