पंढरपूर शहरातील मुतारी गेल्या चोरीला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 31, 2026

पंढरपूर शहरातील मुतारी गेल्या चोरीला

 पंढरपूर शहरातील मुतारी गेल्या चोरीला 

युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदिप शिंदे यांनी दिले मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन


पंढरपूर(कटूसत्य वृत्त):- मागील काही वर्षांपासून युवक काँग्रेसच्या वतीने पंढरपूरातील चोरीस गेलेल्या मुतारी बाबत बरेच आंदोलने केली परंतू नगरपालिका प्रशासनाने आश्वासन दिले त्यामुळे ते आंदोलन थांबले होते. तरी तत्कालीन मा. मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांना व जिल्हाधिकारी श्री. कुमार आशिर्वाद साहेब व मा. प्रांत अधिकारी साहेब श्री. गजानन गुरव व मुख्याधिकारी पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर श्री. प्रशांत जाधव साहेब यांना निवेदन देण्यात आले होते. परंतू त्या निवेदनाकडे त्यांचेकडून देखील दुर्लक्ष झाले आहे.
दिनांक ०५/०८/२०२४ रोजी युवक शहर काँग्रेस अध्यक्ष मा. संदिप शिंदे यांनी नगरपालिकेच्या समोर जागरगोंधळ घालून व अमरण उपोषण करून त्याकडे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळेस प्रशांत जाधव साहेब, यांनी त्यावेळी आश्वासन दिले की, पुढील सहा महिन्यामध्ये काही ठिकाणी सार्वजनिक मुतारी बांधून देतो असे आश्वासन दिले होते. परंतू त्याही कडे दुर्लक्ष करण्यात आले.
तरी, पंढरपूरातील सर्व मुतारी त्वरीत बांधून घेण्यात यावेत. नाहीतर वेगळ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल त्याची मुख्याधिकारी प्रशासनाने व नगराध्यक्ष यांनी निवेदनाची दखल घ्यावी असा इशारा 
युवक काँग्रेस आयचे पंढरपूर शहराध्यक्ष,  संदिप शिंदे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी पंढरपूर काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष संदीप पाटील शहराध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष सोमनाथ आरे सोशल मीडिया शहराध्यक्ष महेश अधटराव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देवानंद इरकल युवक काँग्रेस उपाध्यक्ष संग्राम मुळे उपाध्यक्ष रवी अग्रवाल, सचिव अक्षय वनसाळे , अण्णासो पवार सुरज शिंदे अनिल माने संतोष पाटील विशाल धोत्रे व महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages