पीसीयूच्या अथर्व भागवत याने राष्ट्रीय आर्म रेसलिंग मध्ये पटकावले रौप्य पदक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 31, 2026

पीसीयूच्या अथर्व भागवत याने राष्ट्रीय आर्म रेसलिंग मध्ये पटकावले रौप्य पदक

 पीसीयूच्या अथर्व भागवत याने राष्ट्रीय आर्म रेसलिंग मध्ये पटकावले रौप्य पदक

 



पिंपरी, पुणे (कटूसत्य वृत्त):-पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) मधील बी.एस्सी. न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स शाखेतील विद्यार्थी अथर्व अविनाश भागवत याने ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप २०२५-२६ मध्ये पुरुष विभागात ८५ किलो वजन गटात रौप्य पदक पटकावले. अलिगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह विद्यापीठ येथे असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत पीसीयू क्रीडा संचालक डॉ. विवेक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्व भागवत याने हे यश संपादन केले. त्याचे अभिनंदन करताना पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे यांनी सांगितले की, पीसीयू मधील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रम बरोबर क्षेत्रातच क्रीडा क्षेत्रासाठी देखील प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात त्यामुळेच पीसी मधील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर क्रीडा स्पर्धेत यश मिळवत आहेत. 
       पीसीयूच्या वतीने अथर्व भागवत याचा सत्कार करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीइटी अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम, गराडे, व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ गिरीश देसाई तसेच प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, कुलसचिव डॉ. अनिल महेश्वरी, विभाग प्रमुख डॉ. रुचू कुथियाला यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages