राज्यात पुढील दोन दिवस अवकाळीचा तडाखा
सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची तीव्रता वाढणार असून, यामध्ये पुढील दोन दिवसांत काही जिल्ह्यांना गारपिटीसह जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
यात मंगळवारी पुणे, सातारा,मंगळवारी पुणे, सातारा, सांगली, सोलापुरला तीव्रता अधिकसांगली, सोलापूर जिल्ड्यांचा समावेश आहे.
राजस्थान, आसाम, रायलसीमा, दक्षिण कर्नाटकवर असलेली हवेची द्रोणीय स्थिती तसेच यातून वाहणाऱ्यावाऱ्यांच्या संघर्षामुळे सध्या देशाच्या अनेक भागांत अवकाळी पावसाने जोर पकडला आहे. यामुळे पुढील दोन दिवसांत राज्यातील काही जिल्हयांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
यात सोमवारी अहिल्यानगर, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात काही भागात गारपिटही होणार आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक जिल्हयांत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment