अमित ठाकरेंनी घेतली बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबाची भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 31, 2026

अमित ठाकरेंनी घेतली बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबाची भेट

 अमित ठाकरेंनी घेतली बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबाची भेट




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे हे आज (ता. 30 मार्च) सोलापूर दौऱ्यावर आले होते. महापालिका निवडणुकीदरम्यान मनसे विद्यार्थी सेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची ठाकरे यांनी पुन्हा भेट घेतली.

या भेटीनंतर अमित ठाकरे यांनी आरोप जेलमध्ये बसून निवडून येतात, हे यंत्रणेचे अपयश आहे, अशी खंत व्यक्त केली.

सोलापूर महापालिका निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांचा खून झाला होता. त्यावेळी अमित ठाकरे यांनी सोलापुरात तातडीने येत सरवदे कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. त्यावेळी अमित ठाकरे यांनी सरवदे यांच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. त्यानंतर सरवदे कुटुंबाच्या भेटीसाठी अमित ठाकरे पुन्हा सोलापुरात आले होते.

सरवदे कुटुंबीयांच्या भेटीनंतर अमित ठाकरे म्हणाले, बाळासाहेब सरवदे यांचा खून झाला, त्या वेळी मी आलो होतो आणि आज त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलो आहे. आज त्यांच्या मुली आनंदित होत्या, हे पाहून बरं वाटलं.

जेलमध्ये बसून आरोपी निवडून येतात, याचा अर्थ हे व्यवस्थेचं अपयश आहे. मुळात आरोपींना निवडणूक लढवता आली नाही पाहिजे. मात्र, जेलमध्ये बसून ते निवडून येतात, अशी खंतही अमित ठाकरे यांनी बोलून दाखवली.

'पार्थ पवार-राज ठाकरे भेट कशासाठी मला माहिती नाही'

पार्थ पवार-राज ठाकरे भेटीवर अमित ठाकरे यांनी ती भेट कशासाठी होती, हे मला माहिती नाही. मी गेल्यावर राज ठाकरेंशी चर्चा केली. त्यांची काय चर्चा झाली, ते मला माहिती नाही. अशोक खरात प्रकरण पत्रकारांनी शेवटपर्यंत नेले पाहिजे. त्याचा पाठपुरावा सोडू नये, अशी सूचनाही अमित ठाकरेंनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages