भाजप नगरसेवक आणि शिवसेना गटनेते आमने सामने - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 31, 2026

भाजप नगरसेवक आणि शिवसेना गटनेते आमने सामने

 भाजप नगरसेवक आणि शिवसेना गटनेते आमने सामने

सोलापूर महापालिकेत मोठा गोंधळ,शाब्दिक वाद झाल्यानं तणाव




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वार्षिक बजेटवेळी मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. भाजप नगरसेवक आणि शिवसेनेच्या गटनेत्यामध्ये शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळं महानगरपालिकेत काही काळ तणााचे वातावारण निर्माण झाले होते.

शिवसेनेचे गटनेते वार्षिक अंदाजपत्रकावरती भाषण करत असताना हा गोंधळ निर्माण झाला आहे.

महापालिकेच्या सभागृहात काही वेळ तणाव

वार्षिक अंदाजपत्रकावरती शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे भाषण करत होते. यावेळी भाजपाचे नगरसेवक प्रशांत पल्ली हे मध्ये बोलल्याने वाद निर्माण झाला होता. शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे यांनी आक्रमक होत भाजपाचे नगरसेवक प्रशांत पल्ली यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. मी बोलताना मध्ये तुम्ही बोलण्याचा संबंध काय? असा जाब यावेळी अमोल शिंदे यांनी आक्रमक भूमिकेत विचारला. या वादामुळे महापालिकेच्या सभागृहात काही वेळ तणाव पाहायला मिळालe. दरम्यान महापौर विनायक कोंड्याल आणि भाजपच्या वरिष्ठ नगरसेकांनी मध्यस्ती करत शांत करण्याचा प्रयत्न केला.

सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देखील भाजप आणि शिवसेना आमने सामने होते

सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देखील भाजप आणि शिवसेना आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं होतं. अंतिम निकाल जाहीर झाला तेव्हा एकूण 102 जागांपैकी भाजपने 87 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले होते. निवडणूक निकालानुसार एमआयएमने 8 जागा, शिवसेना (शिंदे गट) 4 जागा, काँग्रेस 2 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 1 जागा जिंकली होती. त्यामुळं सोलापूर महानगरपालिकेवर भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. त्यामुळं भाजपचे विनायक कोंड्याल यांना महापौरपदी संधी देण्यात आली होती. दरम्यान, आता निवडणूक झाल्यानंतर देखीस सभागृहात भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं सोलापूर महापालिकेत काही काळ तणावाचे वातावरण असल्याचे चित्र दिसत आहे.

सोलापूर महापालिका निवडणुकीत महायुती तुटल्यानंतर भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचे पाहायला मिळाले होते. शिवसेनेचे अमोल शिंदे हे आक्रमकपण पक्षाची भूमिका मांडत होते. त्यानंतर भाजपला या निवडणुकीत मोठं यश मिळालं होतं. तर दुसऱ्या बाजुला शिवसेनेला कमी यश मिळालं. शिवसेनेच्या फक्त चार च जागा निवडून आल्या. यामध्ये अमोल शिदे देखील निवडून आले होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages