भीम जयंती निमीत्त सम्राट प्रतिष्ठान विविध कार्यक्रम राबविणार- शशिकांत भोसले
अकलूज (कटूसत्य वृत्त):- भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने, सम्राट प्रतिष्ठान अकलूज यांच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सम्राट प्रतिष्ठानचे संस्थापक शशिकांत भोसले यांनी दिली.
प्रसार माध्यमांशी बोलताना सम्राट प्रतिष्ठानचे संस्थापक शशिकांत भोसले म्हणाले की महापुरुषांच्या विचारांची जयंती साजरी होणे गरजेचे आहे. सध्याच्या युगात तरुण पिढीला मोबाईलचे जास्त आकर्षण आहे, तरुण पिढी मोबाईलच्या जगात हरवत चालली आहे. आणि हे येणाऱ्या काळासाठी खूप घातक आहे असे वाटते.कारण कृत्रिम बुद्धिमत्तेचा जास्त वापर होताना दिसत आहे. शिवाय वाचना पासून आपण दूर जाऊ लागलो आहे. याकरिता महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम राबवणे गरजेचे आहे, म्हणून आम्ही याही वर्षी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचे सम्राट प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत भोसले म्हणाले.
चौकट
सध्या अकलूज परिसरामध्ये सम्राट प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात येणारे वेगवेगळे उपक्रम हे कौतुकास्पद ठरत आहेत. प्रत्येक महापुरुषांची जयंती साजरी करणे, जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देणे, महिलांसाठी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून जयंती साजरी करणे यामुळे सम्राट प्रतिष्ठानचे सर्वत्र कौतुक होत आहे. राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक कार्यक्रमासाठी सम्राट प्रतिष्ठानचे संस्थापक शशिकांत भोसले व अध्यक्ष कोमलताई भोसले यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते.
.png)
No comments:
Post a Comment