घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 13, 2026

घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड

 घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सध्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे भविष्यात इंधनाचा तुटवडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासन व सोलापूर जिल्हा प्रशासनाने घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर टाळण्यासाठी विशेष पथके स्थापन केली आहेत.  

 जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांच्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यात पथक कार्यरत असून, पंढरपूर तालुक्यातील पथकाने तहसीलदार सचिन लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.  

पथक प्रमुख विजय तुकाराम बादल (पुरवठा निरीक्षक) व पुरवठा सहाय्यक उमेश हिंगमिरे यांनी मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 11 मार्च 2026 रोजी रात्री साडेदहा वाजता सांगोला रोड, महाराज मठासमोर पंढरपूर येथे धाड टाकली. या ठिकाणी घरगुती गॅसचा अवैध वापर होत असल्याचे आढळून आले.  

कारवाईदरम्यान घरगुती वापरातील आठ सिलेंडर टाक्या व व्यावसायिक पाच सिलेंडर टाक्या जप्त करण्यात आल्या. आरोपी गणेश राजू बोरीकर (वय 24, रा. पंढरपूर) याच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशन, पंढरपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, मागणीप्रमाणे गॅस सिलेंडर उपलब्ध केले जाणार आहेत. तरीही युद्धजन्य परिस्थिती पाहता गॅस सिलेंडरचा काटकसरीने वापर करावा, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच शासनास सहकार्य करावे.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages