आंतरराज्यीय मोटारसायकल चोरटे अटकेत; ६ दुचाकी जप्त - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 21, 2026

आंतरराज्यीय मोटारसायकल चोरटे अटकेत; ६ दुचाकी जप्त

 आंतरराज्यीय मोटारसायकल चोरटे अटकेत; ६ दुचाकी जप्त




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर गुन्हे शाखेने दुचाकी चोरीच्या घटनांवर मोठी कारवाई करत आंतरराज्यीय दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल १ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या ६ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे प्रमोद अर्जुन जेजर (वय २९, रा. अंतरगा, ता. इंडी, जि. विजयपूर, कर्नाटक) व अमोल भाऊसाहेब चव्हाण (वय २६, रा. जाधव वस्ती, आर्केरी, ता. विजयपूर, कर्नाटक) अशी आहेत. दोघेही शिक्षण व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

सोलापूर शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवली होती. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. दि. १९ मार्च रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

तपासादरम्यान आरोपींकडून खालील ६ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत :
🔹 MH-13-DP-1927 – किंमत ₹15,000
🔹 MH-10-BY-4692 – किंमत ₹10,000
🔹 MH-13-BD-0532 – किंमत ₹15,000
🔹 MH-13-AY-7752 – किंमत ₹35,000
🔹 MH-13-BW-3997 – किंमत ₹50,000
🔹 MH-13-ED-4413 – किंमत ₹50,000

 एकूण जप्त मालमत्ता :₹1,75,000
ही सर्व वाहने सोलापूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी करण्यात आली होती. यामध्ये सदर बझार, फौजदार चावडी व एमआयडीसी पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.
या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये भादंवि कलम ३०३(२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींनी आणखी गुन्ह्यांची कबुली दिल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages