ईच्छा भगवंताची परिवाराच्या‎ वतीनं सोलापूरच्या‎ विकासाच्या शिलेदारांचा‎ सन्मान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 2, 2026

ईच्छा भगवंताची परिवाराच्या‎ वतीनं सोलापूरच्या‎ विकासाच्या शिलेदारांचा‎ सन्मान

 ईच्छा भगवंताची परिवाराच्या‎ वतीनं सोलापूरच्या‎ विकासाच्या शिलेदारांचा‎ सन्मान





सोलापूर‎ (कटूसत्य वृत्त):- ईच्छा‎ भगवंताची‎ परिवाराच्या‎ वतीने‎ भाजपा नगरसेवक‎ किसन जाधव यांच्या सात रस्ता‎ परिसरातील‎ सोनामाता प्रशाला‎ समोरील संपर्क‎ कार्यालयात‎ नूतन‎ स्वीकृत नगरसेवक तसेच‎ स्थायी‎ समिती सदस्यांचा‎ भव्य‎ सत्कार‎ सोहळा उत्साहात‎ पार पडला. शाल,‎ भगवा फेटा,‎ वृक्ष आणि‎ स्वामी‎ विवेकानंद‎ यांच्या जीवन चरित्रावरील पुस्तक‎ भेट देऊन‎ मान्यवरांचा‎ गौरव करण्यात‎ आला या कार्यक्रमास‎ महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी‎ देवकर‎ यांच्यासह माजी‎ महिला‎ व‎ बालकल्याण‎ समिती‎ सभापती, अश्विनी चव्हाण, संगीता जाधव,‎ स्वीकृत‎ नगरसेविका वृषाली‎ चालुक्य,‎ देवकर मावशी,‎ बिजू‎ प्रधाने, सत्यनारायण‎ गुर्रम,‎ विजय‎ चिप्पा, शिवाजी वाघमोडे,‎ सतीश‎ शिरसिल्ला, भरतसिंग‎ बडूरवाले,‎ अक्षय अंजिखाने, श्रीनिवास‎ दायमा, ज्ञानेश्वर म्याकल, अँड.‎ ऋषिकेश मेट्रे, रुद्रेश बोरामणी,‎ विठ्ठल‎ मेट्रे आदी‎ उपस्थित होते.‎ यावेळी किसन‎ जाधव,‎ नगरसेवक दत्तात्रय‎ नडगिरी, माजी परिवहन समिती‎ सदस्य संतोष‎ कदम,‎ युवा‎ नेते चेतन नागेश‎ आण्णा‎ गायकवाड,‎ महेश‎ देवकर,‎ वृक्षमित्र मनोज‎ देवकर,‎ निलेश कांबळे, अरविंद‎ शेरखाने, संतोष‎ गायकवाड‎ (हुडको), अमोल जगताप,‎ रामभाऊ मिस्त्री, किरण शिंदे, हुलगप्पा शासम, उत्कर्ष‎ गायकवाड, यल्लाप्पा शिवापुरी,‎ प्रथमेश‎ पवार, ऋषी‎ येवले,‎ बिराजदार‎ मावशी,‎ शोभा गायकवाड,‎ मारता‎ असादे,‎ प्रमिला स्वामी,‎ शहाजान शेख, फिरोज‎ पठाण आदींची उपस्थिती‎ लक्षणीय‎ ठरली. सत्कारास‎ उत्तर‎ देताना‎ महापौर विनायक‎ कोंड्याल‎ यांनी सोलापूर शहराच्या‎ सर्वांगीण‎ विकासासाठी सर्व घटकांना‎ सोबत‎ घेऊन‎ पारदर्शक‎ व विकासाभिमुख काम‎ करू,‎ अशी ग्वाही‎ दिली. शहरातील मूलभूत‎ सुविधा,‎ स्वच्छता, पायाभूत विकास आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर प्राधान्याने‎ लक्ष‎ केंद्रित केले जाईल,‎ असे मनोगत‎ उपमहापौर ज्ञानेश्वरी‎ देवकर यांनी व्यक्त केले‎ यावेळी उपस्थित नूतन‎ सदस्यांना किसन‎ जाधव‎ यांनी शुभेच्छा‎ दिल्या. या कार्यक्रमामुळे सोलापूरच्या विकासाच्या‎ शिलेदारांना‎ एकत्र‎ आणण्याचा‎ संदेश देत शहरात सकारात्मक‎ राजकीय वातावरण निर्माण झाल्याचे चित्र‎ दिसून आले.‎

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages