अनगरच्या पाटील विद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 2, 2026

अनगरच्या पाटील विद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा

 अनगरच्या पाटील विद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा



 


अनगर (कटूसत्य वृत्त):- अनगर येथील कै शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कवी कुसुमाग्रज तथा वि.वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी विद्येची देवता सरस्वती, कवी कुसुमाग्रज व स्वर्गीय लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते झाले.
 यावेळी मान्यवरांचे हस्ते मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित हस्ताक्षर व निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य महादेव चोपडे हे होते.

यावेळी पंढरपूर येथील डिजिटल मिडियाचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ कवी व पत्रकार सचिन कुलकर्णी यांच्या उपस्थितीत कवी संमेलन संपन्न झाले यात प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी  सहभाग घेतला.
यावेळी श्रीअनगरसिध्द शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी आधिकारी चंद्रकांत ढोले यांनी शिक्षकांना भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी परमेश्वर थिटे,अनुराधा गोडसे ,अर्चना गुंड,प्राजक्ता देंडे, तात्या गायकवाड, आदींनी आपल्या रचना सादर केल्या.
यावेळी उपप्राचार्य माधव खरात पर्यवेक्षक राजेंद्र डोके बापूराव घुले, बजीरंग पाचपुंड, अमोल खताळ, अनुराधा गोडसे ,प्राजक्ता देंडे, चंद्रकला उघडे,गीतांजली माळी, रेश्मा थिटे, अर्चना गुंड व रूपाली कदम आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सत्यवान दाढे यांनी सूत्रसंचालन केले तर बजीरंग पाचपुंड यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages