सिंहगड मध्ये मराठी राज्यभाषा दिन साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय येथे शुक्रवारी सकाळी मराठी राज्यभाषा दिन (कवी कुसुमाग्रज जयंती) उत्साहात साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाच्या ग्रंथालयात शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी भाषेचे महत्त्व, साहित्यिक परंपरा आणि कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्यिक योगदानावर यावेळी विचार मांडण्यात आले. यावेळेस कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठचे पीएम उषाचे समन्वयक डॉ. प्रभाकर कोळेकर उद्योगवर्धिनीच्या चंद्रिकाताई चव्हाण, प्रा. सुनिल शाखापुरे आदींची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेचा आत्मविश्वास वाढवणारा ‘बूटकॅम्प फॉर इनोव्हेटर्स’ दोन दिवसीय कार्यक्रमास प्रारंभ झाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठच्या नवोन्मेष, उद्योजक घडवणूक (इन्क्युबेशन) आणि संलग्नता विभाग (IIL) या विभागाच्या वतीने तसेच एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या सहकार्याने पार पडत आहे.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेप्रती अभिमान आणि जाणीव निर्माण करण्याचा उद्देश साध्य झाला. महाविद्यालय प्रशासनाने अशा उपक्रमांमुळे मराठी भाषेचा सन्मान व संवर्धन होण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त केले.

No comments:
Post a Comment