आरोग्याची वारी शिवशंभोच्या दारी,२ हजार शिव भक्तांना घेतला आरोग्य सेवेचा लाभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 27, 2026

आरोग्याची वारी शिवशंभोच्या दारी,२ हजार शिव भक्तांना घेतला आरोग्य सेवेचा लाभ

 आरोग्याची वारी शिवशंभोच्या दारी,२ हजार शिव भक्तांना घेतला आरोग्य सेवेचा लाभ



नातेपुते (कटूसत्य वृत्त) :- 
शिखर शिंगणापूर यात्रेनिमित्त अनेक भाविक कावड खांद्यावर घेऊन चैत्र वारीसाठी शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेवाच्या दर्शनासाठी मराठवाडा, विदर्भ, कर्नाटक आदी भागातून पायी चालत येत असतात. यामध्ये मोठ्या संख्येने महिला वर्ग, जेष्ठ नागरिक व युवक  मोठ्या उत्साहाने कावड यात्रेमध्ये सहभागी होतात. हे सर्व शिवभक्त अनवाणी पायी चालत येत असल्याने अनेकांच्या पायाला भेगा पडून रक्तस्राव होत असतो तर अनेकांना वैद्यकीय समस्यांना शिवभक्तांना सामोरे जावे लागते या सर्व बाबींची दखल घेऊन शिवसेना ओबीसी चे जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा मुख्य नेते एकनाथराव शिंदे  यांच्या संकल्पनेतून व आरोग्य मंत्री  प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेसाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी माळशिरस तालुक्यामध्ये विविध ठिकाणी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची निर्मिती करण्यात आली असून त्यापैकी नातेपुते येथील गिरजापती मंदिरा लगत निर्मिती करण्यात आलेल्या दवाखान्यामध्ये २ हजार पेक्षा जास्त शिवभक्तांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. यामध्ये शिवभक्तांचे ब्लड प्रेशर तपासणी, आरोग्याच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपचार करणे, योग्य औषधोपचार देणे, शरीरातील थकवा दूर करण्यासाठी इलेक्ट्रॉन पावडर देणे इत्यादी उपचार करून शिवभक्तांच्या तपासण्या करून आवश्यकतेनुसार औषधे उपचार त्या ठिकाणी शिवभक्तांना मोफत देण्यात आले असून अनेक शिवभक्त या दवाखान्याचा लाभ घेत आहेत.
 डॉ. शिवाजी शेंडगे. वैद्यकीय अधिकारी 
साधना दोलताडे. औषधं निर्माण अधिकारी 
चिऊताई पाखरे. परिचारिका  प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवे श्री शंभू महादेव यात्रा अंतर्गत  नातेपुते येथील औषधोपचार केंद्र. श्रीमंती डॉ सावंत एस बी वैद्यकीय अधिकारी श्री धाईंजे ए बी. आरोग्य सहाय्यक, गुजरे एस आर. आरोग्य सहाय्यक . डॉ खोकले, निलोफर मुलाणी, मंगल सूळ , मंगल काळे  आरोग्य सेविका. व आरोग्य सेवक  जाधव एस. एस. नलावडे एस. पी., तोडकर एस. एन. हे त्या ठिकाणी काम पाहत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages